आशिया चषकाचा आतापर्यंतचा इतिहास व विजेते संघ

आशिया चषक 1984 साली सुरु झाला आणि प्रथम ही स्पर्धा UAE मध्ये खेळली गेली. आशिया कपच्या आतापर्यंत एकूण 15 आवृत्त्या झाल्या आहेत, त्यापैकी भारताने सर्वाधिक 7 वेळा (1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016 आणि 2018) विजेतेपद पटकावले आहे.

 

श्रीलंकेचा संघ 6 वेळा (1986, 1997, 2004, 2008, 2014 आणि 2022) आशियाई चॅम्पियन बनला आहे. पाकिस्तानने फक्त दोनदा (2000 आणि 2012) आशिया चषक जिंकला आहे. 1986 मध्ये झालेल्या आशिया कपमध्ये भारताने भाग घेतला नव्हता.

Asia cup mahiti marathi

2023 आशिया चषक 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान पाकिस्तान आणि श्रीलंका येथे होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात पाकिस्तानात होईल, तर अंतिम सामना श्रीलंकेत खेळवला जाईल.

 

टीप: 2016 आणि 2022 मध्ये झालेला आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये खेळला गेला. कारण कप टी-20 विश्वचषक काही दिवसांवर येऊन ठेपला होता.

 

आशिया चषक स्पर्धेतील विजेत्यांवर एक नजर टाकूया

1984 आशिया कप, UAE: भारताने येथे दोन्ही सामने जिंकले आणि स्पर्धा जिंकली. श्रीलंकेने एक सामना जिंकून तिसरे स्थान पटकावले आणि पाकिस्तानने दोन्ही सामने गमावले.

 

1986 आशिया चषक, श्रीलंका: श्रीलंकेने अंतिम फेरीत पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करत स्पर्धा जिंकली. 1986 च्या आशिया कपमध्ये भारताने भाग घेतला नव्हता.

 

1988 आशिया चषक, बांग्लादेश: भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले.

 

1990 आशिया कप, भारत: भारताने फायनलमध्ये श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने या स्पर्धेत भाग घेतला नव्हता.

 

1995 आशिया चषक, UAE: भारताने फायनलमध्ये श्रीलंकेचा 8 गडी राखून पराभव करत सलग तिसऱ्यांदा आशिया कप विजेतेपद पटकावले.

 

1997 आशिया कप, श्रीलंका: श्रीलंकेने अंतिम फेरीत भारताचा 8 गडी राखून पराभव करत दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.

 

2000 आशिया चषक, बांगलादेश: पाकिस्तानने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 39 धावांनी पराभव करत प्रथमच आशिया चषक विजेतेपद पटकावले.

See also  भूकंपाची निर्मिती कशी होते?

 

2004 आशिया कप, श्रीलंका: श्रीलंकेने अंतिम फेरीत भारताचा 25 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले.

 

2008 आशिया चषक, पाकिस्तान: श्रीलंकेने अंतिम फेरीत भारताचा 100 धावांनी पराभव करत स्पर्धा जिंकली.

 

2010 आशिया चषक, श्रीलंका: भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा 81 धावांनी पराभव करत स्पर्धा जिंकली.

 

2012 आशिया कप, बांगलादेश: पाकिस्तानने अंतिम फेरीत बांगलादेशचा 2 धावांनी पराभव करत स्पर्धा जिंकली. भारतीय संघाला अंतिम फेरी गाठण्यात यश आले नाही.

 

2014 आशिया चषक, बांगलादेश: श्रीलंकेने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले.

 

2016 आशिया कप, बांगलादेश (T20 फॉरमॅट): भारताने अंतिम सामन्यात बांगलादेशचा 8 गडी राखून पराभव करून आशिया कप जिंकला.

 

2018 आशिया चषक, UAE: भारताने अंतिम सामन्यात बांगलादेशचा शेवटच्या चेंडूवर 3 गडी राखून पराभव नि विजेतेपद पटकावले.

 

2022 आशिया चषक, UAE: श्रीलंकेने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. 2022 मध्ये भारतीय संघ अंतिम फेरी गाठू शकला नाही.

आशिया चषक वर्ष स्पर्धेचे ठिकाण विजेता संघ
1984 UAE भारत
1986 श्रीलंका श्रीलंका
1988 बांग्लादेश भारत
1990 भारत भारत
1995 UAE भारत
1997 श्रीलंका श्रीलंका
2000 बांग्लादेश पाकिस्तान
2004 श्रीलंका श्रीलंका
2008 पाकिस्तान श्रीलंका
2010 श्रीलंका भारत
2012 बांग्लादेश पाकिस्तान
2014 बांग्लादेश श्रीलंका
2016 बांग्लादेश भारत
2018 UAE भारत
2022 UAE श्रीलंका

 

 

Leave a Comment