एसक्यूएल कमांडचे प्रकार । SQL Commands in Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्टमध्ये SQL कमांड्सबद्दल जाणून घेणार आहोत. SQL कमांड काय आहे? त्याचा उपयोग काय? तर SQL चे पूर्ण रूप म्हणजे स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. SQL कमांड database शी संवाद साधण्यासाठी वापरल्या जातात.

डेटाबेसमध्ये tables तयार करण्यासाठी, तयार केलेल्या टेबलमध्ये डेटा insert करण्यासाठी, table मधील data ला display करण्यासाठी, डेटा modify करण्यासाठी आणि डेटा delete करण्यासाठी SQL कमांडचा वापर केला जातो.

एसक्यूएल कमांडचे प्रकार - sql commands
एसक्यूएल कमांडचे प्रकार

एसक्यूएल कमांडचे प्रकार । SQL command in marathi

  • DDL(Data Definition Language)
  • DML (Data Manipulation Language)
  • DCL (Data control language)
  • TCL (Transaction control language)
  • DQL (Data query language)

 

1. DDL (Data Definition Language)

टेबलची रचना बदलण्यासाठी Data definition language वापरली जाते. जसे की table create करणे, table delete करणे, table structure update करणे, table मध्ये column add जोडणे, column delete करणे, table column चे नाव update करणे. सर्व DDL commands auto-committed आहेत. याचा अर्थ डेटाबेसमध्ये केलेले सर्व बदल आपण बदलल्याशिवाय बदलत नाहीत.

DDL च्या commands

  • CREATE (तयार करणे)
  • ALTER (बदल करणे)
  • DROP (काढून टाकणे)
  • TRUNCATE (टेबलमधील सर्व डेटा delete करणे)

a. CREATE
नवीन टेबल तयार करण्यासाठी CREATE कमांड वापरली जाते.

syntax:
CREATE TABLE table_name(
column1 datatype,
column2 datatype,
column3 datatype,
…….
);

Example:
CREATE TABLE students(
id int,
FirstName varchar(255),
LastName varchar(255),
Mobile varchar(255),
Email varchar(255),
Address varchar(500)
);

 

b. ALTER
तयार केलेल्या टेबलची रचना बदलण्यासाठी ALTER कमांडचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, ALTER कमांड टेबलमधील कॉलम्सचे डेटाटाइप सुधारण्यासाठी, टेबलमध्ये new column add करण्यासाठी वापरली जाते.

syntax:
ALTER TABLE table_name ADD column_name datatypes;

Example:
ALTER TABLE students ADD Enroll_no varchar(255);

त्याचप्रमाणे, तुम्ही टेबलमधील विद्यमान कॉलमचे नाव आणि डेटाटाइप बदलू शकता आणि कॉलम हटवूही शकता.

See also  तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रात झालेले बदल

 

c. DROP
DROP कमांडचा वापर डेटाबेसमधील आधीपासून अस्तित्वात असलेला TABLE DROP करण्यासाठी केला जातो.

syntax
DROP TABLE table_name;

Example:
DROP TABLE students;

 

d. TRUNCATE
TRUNCATE कमांडचा वापर टेबलमधील विद्यमान डेटा delete करण्यासाठी केला जातो. हे कमांड table delete करत नाही परंतु table मधील सर्व डेटा delete करते.

syntax:
TRUNCATE TABLE table_name;

Example:
TRUNCATE TABLE table_name;

 

 

2. DML (data manipulation language)

डेटाबेस modify करण्यासाठी DML कमांडचा वापर केला जातो. डेटाबेसमध्ये केलेल्या सर्व बदलांसाठी DML कमांड जबाबदार असते.
DML च्या commands जसे की

  • INSERT
  • UPDATE (बदल करणे)
  • DELETE

a. INSERT
INSERT command ही SQL क्वेरी आहे. ज्याचा उपयोग डेटाबेसच्या टेबलमध्ये डेटा INSERT करण्यासाठी केला जातो. table मध्ये data row आणि column च्या स्वरूपात संग्रहित केला जातो!.

syntax:
INSERT INTO table_name( column1,column2,…. ) VALUES( value1, value2,…. );

Example:
INSERT INTO students VALUES( value1, value2, value3,… );

 

b. UPDATE (अपडेट)
अपडेट command चा वापर टेबलमध्ये साठवलेला डेटा modify (update, change) करण्यासाठी केला जातो.

syntax:
UPDATE table_name SET column1 = ‘value1’, column2 = ‘value2’ WHERE condition

Example:
UPDATE students
SET FirstName = ‘value1’, LastName = ‘value2’ WHERE id=1;

 

c. DELETE
DELETE command चा वापर टेबलमध्ये साठवलेला डेटा काढून म्हणजेच DELETE करण्यासाठी केला जातो.

syntax:
DELETE FROM table_name WHERE condition;

Example:
DELETE FROM students WHERE id=1;

 

 

3. DCL (Data control language)

DCL commands चा वापर डेटाबेस वापरकर्त्यास अधिकार प्रदान करण्यासाठी आणि परत घेण्यासाठी केला जातो.

DCL च्या command जसे की

  • Grant
  • Revoke

a. Grant
Grant command डेटाबेस वापरकर्त्यांना प्रवेश प्रदान करण्यासाठी वापरली जाते.

 

b. Revoke
Revoke command डेटाबेस वापरकर्त्यांकडून परवानग्या परत घेण्यासाठी वापरली जाते.

See also  कॉम्पुटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर

 

 

4. TCL (Transaction control language)

TCL कमांड फक्त INSERT, DELETE आणि UPDATE सारख्या DML कमांडसह वापरली जाऊ शकते. हे ऑपरेशन डेटाबेसमध्ये स्वयंचलितपणे केले जाताता. त्यामुळे ते table create करताना वापरता येत नाहीत किंवा DROP (DELETE) करता येत नाहीत.

TCL commands जसे की

  • COMMIT
  • ROLLBACK
  • SAVEPOINT

a. COMMIT (कमिट)
कमिट command डेटाबेसमधील सर्व transactions save करण्यासाठी वापरली जाते.

 

b. ROLLBACK (रोलबॅक)
रोलबॅक command सर्व transactions पुनर्प्राप्त करण्यासाठी वापरली जाते. जे डेटाबेसमध्ये आधीपासून केलेले नाही.

 

c. SAVEPOINT (बचत)
सर्व transactions परत न करता transactions एका विशिष्ट बिंदूवर परत आणण्यासाठी SAVEPOINT command वापरली जाते.

 

 

5. DQL (Data query language)

डेटाबेसमधील डेटा display करण्यासाठी DQL कमांडचा वापर केला जातो.

DQL command जसे की
SELECT

syntax:
SELECT expressions
FROM table_name
WHERE conditions

Example:
SELECT * FROM students WHERE id=2;

 

Leave a Comment