दिलीप कुमार उर्फ मोहम्मद युसुफ खान हे भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते म्हणून त्यांची ओळख आहे. दिलीपकुमार हे त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेते मानले जायचे, त्यांच्या शोकांतिक भूमिकांमुळे त्यांना ‘ट्रॅजेडी किंग’ या टोपण (nickname) नावानेही ते ओळखले जायचे. याशिवाय त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पाकिस्तान सरकारच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. त्याशिवाय सन 2000 पासून ते राज्यसभेचे सदस्य होते.
परिचय
दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी पाकिस्तानमधील पेशावर शहरात झाला होता. त्यांना बालपणी मुहम्मद युसुफ खान या नावाने ओळखले जात होते. त्यांच्या वडिलांचे नाव लाला गुलाम सरवार होते, जे फळांची विक्री करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत.
दिलीप कुमार यांचे सुरुवातीचे जीवन गरीबीत व्यस्थित झाले होते. त्यांच्या वडिलांच्या व्यवसायात तोटा झाल्यामुळे त्यांनी पुण्यातील कॅन्टीनमध्ये (canteen) काम करण्यास सुरवात केली. इथेच देविका राणी यांनी प्रथम त्यांचे लक्ष वेधून घेतले आणि दिलीप कुमार यांना अभिनेता केले. देविका राणी यांनी आपले नाव बदलून ‘युसूफ खान’ ऐवजी ‘दिलीप कुमार’ केले. वयाच्या पंचविसाव्या वर्षी दिलीप कुमार देशातील पहिला क्रमांकाचे अभिनेते म्हणून त्यांची संपूर्ण देशभरात ओळख निर्माण झाली.
लग्न | Marriage
दिलीप कुमार यांनी अभिनेत्री सायरा बानोशी सन 1966 मध्ये लग्न केले. लग्नाच्या वेळी दिलीप कुमार 44 वर्षांचे होते आणि सायरा बानो 22 वर्षांची होती. 1980 च्या दशकात त्यांनी आस्माबरोबर दुसरे लग्नही केले होते.
करियर | Career
दिलीपकुमार यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात 1944 साली आलेल्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाने केली होती. तथापि हा चित्रपट यशस्वी झाला नाही. त्यांचा पहिला हिट चित्रपट “जुगनू (Jugnu)” होता. 1947 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने दिलीपकुमार यांना बॉलिवूडमधील हिट फिल्मस्टार्समध्ये (film stars) स्थान मिळवून दिले. 1949 मध्ये दिलीप कुमार यांनी राज कपूरबरोबर पहिल्यांदा “अंदाज” चित्रपटात काम केले आणि त्यांचा हाही चित्रपट हिट ठरला.
दीदार (1951) आणि देवदास (1955) सारख्या चित्रपटातील गंभीर भूमिकांमुळे ते ट्रॅजेडी किंग (tragedy king) म्हणून ओळखला जाऊ लागले. दिलीप कुमार यांनी मुगले-ए-आजम (1960) मध्ये मुघल राजपुत्र जहांगीरची भूमिका केली होती.
“राम और श्याम” मध्ये दिलीप कुमार यांनी साकारलेली दुहेरी भूमिका आजही लोकांना गुदगुल्या करण्यास यशस्वी ठरते. 1970, 1980 आणि 1990 च्या दशकात त्यांनी कमी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. या तीन दशकांत क्रांती (1981), विधाता (1982), दुनिया (1984), कर्मा (1986), इज्जतदार (1990) आणि सौदागर (1991) अशा प्रमुख चित्रपटांत काम केले होते. व 1998 चा किला हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.
दिलीप कुमार यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर रमेश सिप्पी यांच्या शक्ति चित्रपटात काम केले होते. आणि याच चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
दिलीप कुमार यांच्या करियरमधील टॉप 10 चित्रपट | Top 10 Dilip Kumar Movies
- मुग़ल-ए-आज़म (1960)
- अंदाज (1949)
- नया दौर (1957)
- देवदास (1955)
- राम और श्याम (1967)
- मधुमती (1958)
- गोपी (1970)
- आज़ाद (1955)
- शक्ति (1982)
- सगीना (1974)
दिलीप कुमार आणि मधुबाला | Dilip Kumar & Madhubala
1944 मध्ये दिलीप कुमारने अभिनेत्री मधुबालाला जवार भाटा चित्रपटाच्या सेटवर भेट दिली. त्यानंतर फक्त 18 वर्षांच्या मधुबालाचे दिलीप कुमारवर प्रेम झाले, त्यावेळी दिलीप कुमार हे 21 वर्षांचे होते. वर्ष 1951 मध्ये दोघांनी पुन्हा ताराना चित्रपटात एकत्र काम केले. असे म्हणतात की मुगल-ए-आजम चित्रपटाच्या शूटिंगला 9 वर्षे लागली, त्यादरम्यान त्यांचे प्रेम आणखीनच खोल गेले.
मधुबालाला दिलीपकुमार यांच्याशी लग्न करायचे होते. पण, दिलीपकुमार यांनी नकार दिला. असे म्हटले जाते की दिलीप कुमार लग्नासाठी तयार होते पण, मधुबालाचे कुटुंब या नात्याच्या विरोधात होते. 1958 मध्ये अयातुल्ला खान यांनी दिलीपकुमार यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल केला होता, ज्यामध्ये मधुबाला आणि दिलीपकुमार यांचे प्रेम प्रकरण संपवायचे होते.
मृत्यू | Death
दिलीपकुमार यांना श्वासोच्छवासाच्या समस्येमुळे मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आणि तेथेच त्यांनी 7 जुलै 2021 या दिवशी अखेरचा स्वास घेतला.
Reading your article helped me a lot and I agree with you. But I still have some doubts, can you clarify for me? I’ll keep an eye out for your answers.
Sure, What are your doubts?