तुम्हाला ठाऊक आहे देशभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. तर या महामारीपासुन वाचण्यासाठी सरकारने 1 मे 2021 पासून 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत लसीकरण मोहीम सुरु केली आहे. लस टोचून घेण्यासाठी रेजिस्ट्रेशन (Registration) करणे बंधनकारक राहील अन्यथा लस मिळणार नाही. लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी दिनांक 28 एप्रिल 2021 दुपारी 4 वाजल्यापासून सुरु झाली आहे. नोंदणीसाठी www.cowin.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
नोंदणी कशी करावी यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स(Steps) काळजीपूर्वक बघा.
तुम्ही www.cowin.gov.in या वेबसाईटला भेट दिल्यावर तुम्हांला खाली दिलेली विंडो दिसेल.
तेथे लाल रंगाने अधोरेखित केलेल्या चौकोनात Register/Sign in yourself बटण दिसेल त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर खाली दिलेली विंडो उघडेल.
तुम्ही तुमचं रेजिस्ट्रेशन आरोग्य सेतू अॅपद्वारे सुद्धा करू शकता मी हे तुम्हांला वेबसाईट वरून नोंदणी कशी करायची ते सांगत आहे. तेथे लाल रंगाने अधोरेखित केलेल्या चौकोनात तुम्ही तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि Get OTP बटणवर क्लिक करा. तुम्ही एंटर केलेल्या मोबाईल नंबरवर OTP आल्यावर तो दिलेल्या जागेमध्ये एंटर करा.
OTP एंटर केल्यानंतर Verify & Processed या बटणवर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय झाल्यावर तुमच्यासमोर खाली दिलेली विंडो उघडेल.
नोंद घ्या : एका मोबाईल नंबरवरून 4 लोक रेजिस्ट्रेशन करू शकतात.
तुम्हांला विंडोवर Register Member हे बटण दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर खाली दिलेली विंडो उघडेल. त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमची माहिती नोंदवा आणि Register या बटणवर क्लिक करा.
लसीकरण नोंदणी साठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- चालक परवाना
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- मतदार ओळखपत्र
- एनआरपी स्मार्ट कार्ड
- पेंन्शन पासबुक
तुमच्याजवळ वरीलपैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे गरजेचे आहे. आणि सुचणेप्रमाणे त्याबद्दल माहिती नोंदणी पत्रकात भरणे आवश्यक राहील. अन्यथा तुम्हांला लसीकरण नोंदणी करता येणार नाही.
त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल. तेथे सांगीतल्याप्रमाणे तुम्ही तुमचा पिन कोड नंबर, राज्य, शहर आणि इतर माहिती एंटर करून लसीकरणासाठी तुम्ही तुमच्या जवळ असणारा लसीकरण केंद्र सिलेक्ट करून लस घेऊ शकता. तुम्ही लसीकरण केंद्राची निवड करताना त्यासंबंधी सगळी माहिती तुमच्यासमोर डिस्प्ले होईल ते पाहूनच लसीकरण केंद्राची निवड करा. शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.
Reading your article helped me a lot and I agree with you. But I still have some doubts, can you clarify for me? I’ll keep an eye out for your answers.