प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

नमस्कार शेतकरी बंधू, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) आपल्या देशातील शेतकरी बंधूंसाठी देशभरात राबविली जात आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. 1 डिसेंबर 2018 पासून ही योजना लागू केली गेली आणि तेव्हापासून त्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.

 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकर्‍यांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. आज आम्ही या लेखातून किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात माहिती देणार आहोत. जर तुम्हांला या योजनेबाबत माहिती घ्यायची असल्यास, तर तुम्ही हा लेख काळजीपूर्वक वाचा ही नम्र विनंती.

pm kisan
PM Kisan Samman Nidhi Yojana

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN)

या योजनेंतर्गत, पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 6000 एवढी रक्कम प्रदान केली जाईल. सरकारतर्फे ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये विभागून एका हप्त्यामध्ये रु. 2000 एवढी रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. आणि तिन्ही हप्त्ये (Installment) हे रु. 2000 चे असतील.

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (yojana) ही अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आता शेतकऱ्यांना कोणत्याही आर्थिक संकटांला तोंड देण्याची गरज नाही. व शेतकरी आपल्या शेतीसाठी चांगले बियाणे आणि खते व इतर कृषी उपकरणे खरेदी करू शकतील. पंतप्रधानांचे उद्दिष्ट हे आहे की, येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे होय.

 

या योजनेंतर्गत येणारे शेतकरी आपल्या पिकांचे व शेतजमिनीतिल अडचणींवर मात करुन त्यांच्या आर्थिक अडचणींपासून मुक्त होऊ शकतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी होण्यासाठी केंद्र सरकारने पात्रता निश्चित केली आहे. आपण पात्र ठरल्यास व आपले नाव यादीमध्ये आले तर तुम्हांला या योजनेचा लाभ मिळू शकेल. आणि योजनेंतर्गत निर्धारित केलेली रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

 

 

किसान सन्मान योजनेचे नवीन अपडेट

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेसाठी सरकारने नवीन निकष जारी केले आहेत. या नवीन निकषांनुसार देशातील ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर एवढे शेती क्षेत्र असल्यास, त्यांना ऑगस्टपर्यंत रु. 2000 प्रमाणे सहा हप्त्ये दिले जातील. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेशी जोडलेल्या सर्व शेतकऱ्यांना नोव्हेंबरपर्यंत त्यांचे सर्व हप्ते मिळतील.

See also  पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना 2022 | PM Scholarship Scheme

 

 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 7 वा हप्ता

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आतापर्यंत 6 हप्त्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना 7 हप्ता देण्याची तयारी सुरू आहे, हाहि हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात जाईल. ही योजना पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळातील सर्वात महत्वाची योजना आहे. आणि या योजनेंतर्गत फक्त नोंदणीकृत शेतकर्‍यांनाच योजनेचा लाभ मिळू शकेल.

 

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2021 उद्देश

बंधूंनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे होय. जेणेकरून, शेतकरी त्यांच्या शेतीची काळजी घेऊ शकतील आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुदृढ करुन त्यांचे उदरनिर्वाह योग्य प्रकारे करू शकतील. जो त्याला शेती करण्यास प्रेरणा देईल.

 

 

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

शेतकरी बंधूंनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या शेतकर्‍यांची ऑनलाईन नोंदणी करायची आहे त्यांच्याकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. जमीनीसंबंधी कागदपत्रे
  4. शेतकर्‍याचा नोंदणीकृत (रजिस्टर्ड) मोबाइल नंबर

नोंदणी अर्जात शेतकऱ्यांनी आधार कार्ड संबंधित माहिती आहे तशी व्यवस्तीत भरावी. जर आधार कार्ड कॉपीवरील माहिती व नोंदणी अर्जात भरलेली माहिती वेगळी आढळल्यास शेतकऱ्याचा अर्ज रद्द केला जाईल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा.

 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हेल्पलाईन क्रमांक

मित्रांनो, आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी yojana (PM-KISAN) योजनेअंतर्गत अर्ज केला असेल आणि तुम्हाला त्यासंदर्भात अधिक माहिती मिळवायची असेल किंवा आपली समस्या नोंदवायची असेल तर मदत व संपर्क साधण्यासाठी तुम्ही त्याच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. तेथे तुमची समस्या दूर होईल. संबंधित अधिकारी आपली मदत करतील. हेल्पलाईन क्रमांक खालीलप्रमाणे –

पंतप्रधान-किसान हेल्पलाईन क्रमांक: – 011-24300606

1 thought on “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना”

Leave a Comment