आजपर्यंत आपण ATM चा वापर पैसे काढण्यासाठी जरूर केला असणार. परंतु, तेव्हा तुमच्या मनात कधीच विचार आला नसेल की, पैशाविषयी आपण रेशन पण ATM द्वारे घेऊ. हे मजाक नाही, हकीकत झालं आहे. आता रेशनिंग कार्डधारक ATM द्वारे अन्यधान्य घेऊ शकतात. त्याला धान्य एटीएम (grain ATM) म्हणून नाव देण्यात आले आहे. तर याच grain ATM माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
पहिल्या धान्य एटीएमची स्थापना कोठे करण्यात आली ?
गुरुग्राम (Haryana) येथील फर्रुखनगर येथे पहिल्या वहिल्या ग्रैन एटीएमची (grain ATM) स्थापना करण्यात आली.
धान्य एटीएम मशीन कार्य कार्य कशी करते ?
धान्य ATM ही एक स्वयंचलित मशीन आहे जी बँक एटीएमच्या धर्तीवर कार्य करते. युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम (United Nations World Food Program) अंतर्गत स्थापित करण्यात आलेल्या या मशीनला ऑटोमेटेड (automated), मल्टी कमोडिटी (multi commodity), धान्य वितरण (grain distributor) मशीन असे आहे.
एक म्हणजे या मशीनला ऑपरेट (operate) करण्यासाठी माणसाची गरज नसते. त्यामुळे या मशीनला हाताळण्यासाठी माणसाची गरज नसते. या मशीनची एक खासियत म्हणजे वजनाच्या बाबतीत अत्यंत चोख आहे. आणि एकावेळी, ही मशीन 5 ते 7 मिनिटांत 70 किलो धान्य काढू शकते. ग्राहकांनी मशीन मधून धान्य घ्यायचे झाल्यास आपला आधार कार्ड किंवा रेशन कार्ड नंबर दिलेल्या रकान्यात एंटर करणे आवश्यक राहील.
लाभार्थ्यांनी अन्यधान्य घेण्यासाठी काय करावे ?
मशीनमध्ये टच स्क्रीनसह बायोमेट्रिक मशीन देखील स्थापित केलेली आहे, जेथे लाभार्थ्यास आधार किंवा रेशन कार्डचा क्रमांक भरावा लागेल. बायोमेट्रिकद्वारे अधिकृत केल्यावर, सरकारने स्वतः लाभार्थ्यांना विहित केलेले धान्य मशीन अंतर्गत बसविलेल्या पिशव्यांमध्ये भरले जाईल. गहू, तांदूळ आणि बाजरी असे तीन प्रकारचे धान्य या मशीनद्वारे वितरीत केले जातात.
धान्य मशीनमूळे होणारे फायदे
- आता ग्राहकांना सरकारी रेशन आगारांसमोर धान्य घेण्यासाठी लांबच लांब रांगेमध्ये उभे रहावे लागणार नाही.
- बऱ्याचदा ग्राहकांच्या कमी रेशन मिळाल्याच्या तक्रारी वारंवार होत असतात त्यातून कायमची सुटका झाली.
- हे ATM बसविल्यामुळे सरकारी दुकानांतून रेशन घेणाऱ्यांची वेळ व मोजमाप संबंधित सर्व तक्रारी दूर होतील.
- याचा केवळ ग्राहकांनाच फायदा होणार नाही तर शासकीय आगारांवरील धान्य टंचाईचा त्रासही संपेल.
- सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीत (PDS : Public Distribution System) अधिक पारदर्शकता येईल.
हे पण वाचा…..
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.