11 वी प्रवेशासाठी महाराष्ट्र सीईटी 2021

सन 2021-22 या वर्षी अकरावीच्या प्रवेशाकरिता महाराष्ट्र सीईटी FYJC 2021 घेण्यात येणार आहे. FYJC म्हणजेच प्रथम वर्षासाठी जुनिअर कॉलेज परीक्षा. ही प्रवेश परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. सर्व विद्यार्थ्यांना ही प्रवेश परीक्षा बंधनकारक नाही आहे. परंतु, जे विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना 11 प्रवेशासाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल.

11TH STD CET EXAM 2021
11TH STD CET EXAM 2021

11 वी प्रवेशासाठी महाराष्ट्र सीईटी 2021 | 11 th Maharashta CET 2021

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाने सन 2021 – 22 या वर्षीच्या 11 वी प्रवेशासाठी CET (common entrance test) घेण्याचे ठरविले असून कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 21-08-2021 (21 August, 2021) रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 या वेळेत घेण्यात येईल.

 

आता हल्लीच महाराष्ट्र बोर्डाने 10 वी चा निकाल आपल्या वेबसाईटवर जाहीर केला आहे आणि 11 वी CET परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या परीक्षेसाठी अर्ज दाखल करावे.

11 वी प्रवेश परीक्षा घेण्याचे कारण

तुम्हांला ठाऊक असेलच, गेल्यावर्षीपासून कोरोना विषाणूमुळे सारे जग स्त्रस्त आहे. गेल्यावर्षीसुद्धा म्हणजेच year 2020 याच परीस्थितीमूळे 10 वी चा एक पेपर रद्द करण्यात आला होता. परंतु, अजूनही कोरोना स्तिथी आणि लॉकडाऊन असल्यामुळे या वर्षी म्हणजेच year 2021 मध्ये दहावीची बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आली. म्हणून अकरावी प्रवेशासाठी FYJC प्रवेश परीक्षा घेण्याचा पर्यायी मार्ग शोधला गेला. ही परीक्षा सर्व बोर्ड (state board, cbse, cisce, all international board इ.) च्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाईल.

परीक्षेचे स्वरूप | Exam Pattern

FYJC CET परीक्षा ही दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. हि बहुपर्यायी स्वरूपाची प्रवेश परीक्षा असून प्रश्नपत्रिकेत इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक विज्ञान या विषयांचे प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील. एकूण 100 गुणांची परीक्षा असून या परीक्षेसाठी 2 तासांचा कालावधी असेल. परीक्षा ही ऑफलाईन असल्यामुळे ओ.एम.आर. (OMR) शीटवर उत्तरे मार्क करावी लागतील.

See also  दिलीप कुमार आणि चित्रपटसृष्टी

 

तथापि, FYJC CET परीक्षा ही पर्यायी परीक्षा आहे म्हनजेच बंधनकारक नाही. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेस बसण्याची इच्छा आहे त्यांना CET मधील गुणांच्या आधारे 11 वी मध्ये प्रवेश मिळेल. जे विद्यार्थि ही प्रवेश परीक्षा देण्यास इच्छुक नसतील त्यांना त्यांच्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) गुणवत्तेच्या आधारे प्रवेश मिळेल. महाराष्ट्र सरकारने यापूर्वी दहावीच्या निकालांचे मूल्यांकन निकष जाहीर केले आहे.

 

अधिकृत नोटीसनुसार सीईटीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य दिले जाईल. एफवायजेसी प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यात जे विद्यार्थी सीईटीमध्ये दाखल झाले आहेत त्यांना त्यांच्या गुणांच्या आधारावर प्रवेश मिळेल. अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर एफवायजेसीमधील उर्वरित रिक्त जागा सीईटीमध्ये न बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील.

 

महाराष्ट्र FYJC प्रवेश 2021 संबंधित तपशील वेबसाइटवर उपलब्ध आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि नागपूर अशा 6 क्षेत्रांमध्ये FYJC विभागलेले आहे. या परीक्षेसाठी नोंदणी करायची असल्यास विद्यार्थ्यांनी http://cet.mh-ssc.ac.in या वेबसाइटला भेट द्यावी. इच्छुक विद्यार्थ्यांनी 20-07-2021 ते 26-07-2021 या कालावधीत संबधीत वेबसाईटवर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी हि नम्र विनंती.

Overview Of This Article

Exam Conducted By Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education
Exam Date 21 August, 2021
Exam Time 11.00 AM To 01.00 PM
Total Marks 100
Starting Date of Application 20 July, 2021
Last Date of Application 26 July, 2021
Official Website http://cet.mh-ssc.ac.in

महाराष्ट्र FYJC प्रवेश प्रक्रिया 2021

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाने (MSBSHSE) नुकताच दहावीचा निकाल जाहीर करून 11 प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या CET परीक्षेसाठी तयारी सुरु केली आहे. 11 वी CET परीक्षा झाल्यानंतर वर्ग 11 मधील प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. कोरोनव्हायरस या साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रामधील 2021 या वर्षासाठीची FYJC वर्ग 11 ची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन (online) पद्धतीने होईल.

See also  धान्य एटीएम | India's First Grain ATM
हे पण वाचा…..

Leave a Comment