माधुरी दीक्षित बायोग्राफी मराठीमध्ये

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री (Actress) आहेत. जिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक अजूनही उत्सुक आहेत. माधुरी दीक्षित केवळ अभिनेत्रीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतील डान्सिंग क्वीन (Dancing Queen) देखील आहे. आपल्या हिंदी चित्रपट कारकिर्दीत त्यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले, जे आजही प्रेक्षक मोठ्या आस्थेने पाहतात. माधुरीला 4 वेळा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, 1 वेळा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी विशेष पुरस्कार मिळाला आहे. या सर्व पुरस्कारांव्यतिरिक्त त्यांना भारत सरकारचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार पद्मश्री देऊन देखील सन्मानित करण्यात आले आहे.

 

तर आज आपण याच मराठमोळ्या परंतू, हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजेच बॉलीवूड (Bollywood) गाजवलेल्या अभिनेत्रीच्या जीवनाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत.

Madhuri Dixit
Madhuri Dixit

माधुरी दीक्षित बायोग्राफी मराठीमध्ये

पार्श्वभूमी (Background)

माधुरी दीक्षितचा जन्म १५ मे १९६५ रोजी मुंबईत (mumbai) झाला. त्यांचे वडील शंकर दीक्षित आणि आई स्नेहलता दीक्षित यांच्या लाडक्या माधुरीला लहानपणापासूनच डॉक्टर बनण्याची इच्छा होती, पण ती अभिनेत्री बनली. माधुरी दीक्षितने भारतीय हिंदी चित्रपटांमध्ये एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे ज्याला आजच्या अभिनेत्री स्वतःसाठी आदर्श मानतात. 80 आणि 90 च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आणि सुप्रसिद्ध नृत्यांगना म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

 

 

 

माधुरी दीक्षित शिक्षण (Education)

माधुरीने डिव्हाईन चाइल्ड हायस्कूलमधून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले आहे. आणि त्यांनी मुंबई विद्यापीठातून (Mumbai University) ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

 

 

 

लग्न (Marriage)

माधुरी दीक्षितचा विवाह डॉ. श्रीराम नेने यांच्याशी झाला आहे. त्यांना दोन मुले आहेत – रायन आणि एरिन नेने.

 

 

 

माधुरी दीक्षित चित्रपटसृष्टीतील कारकीर्द

माधुरी दीक्षितने 1984 मध्ये राजश्री प्रॉडक्शनच्या अबोध चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. पण या चित्रपटाला काही विशेष यश मिळवले नाही. त्यांना फिल्मी करिअरमधील सुरुवातीच्या वर्षांमध्ये अनेक अपयशांना सामोरे जावे लागले. मात्र त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली ती ‘तेजाब‘ या चित्रपटातून. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराचे पहिले नामांकनही मिळाले. या चित्रपटातील एक दो तीन हे गाणे आजही माधुरी दीक्षितचे आयकॉनिक गाणे मानले जाते. या यशस्वी चित्रपटानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले आणि हिंदी चित्रपटसृष्टीत बॅक टू बॅक हिट्स दिले. त्यांनी चित्रपट अभिनेता अनिल कपूरसोबत सुमारे वीस चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी बहुतांश चित्रपट सुपरहिट ठरले.

See also  लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जीवनपरिचय | Laxmikant Berde Biography

 

 

 

माधुरी दीक्षित टीव्ही करिअर (TV career)

त्यांनी 1985 मध्ये राजश्री प्रॉडक्शनच्या (Rajshri Productions) पेइंग गेस्ट शोमधून तिच्या टीव्ही करिअरची सुरुवात केली. या शोमध्ये त्या पाहुण्यांच्या भूमिकेत दिसल्या होत्या. यानंतर, 2001 मध्ये, त्या सोनीचा शो कौन बनेगा करोडपतीमध्ये (Kaun Banega Crorepati) दिसल्या.

 

दीक्षित नृत्य आधारित रियालिटी शो मधील नच बलियेमध्ये जज म्हणूनही दिसल्या होत्या. तसेच, त्या नृत्य आधारित रियालिटी शो मधील झलक दिखला जा सीझन 4, 5, 6, 7 मध्ये जज म्हणून दिसल्या.

 

 

 

माधुरी दीक्षित प्रसिद्ध चित्रपटे (Hit Films)

माधुरी दीक्षित यांनी आतापर्यन्त जास्तकरून हिंदी चित्रपटामध्येच (Hindi Movies) जास्त काम केल आहे. आणि त्यातील काही सुपरहिट हिंदी सिनेमे (Hindi Cinema) पुढीलप्रमाणे :

 

तेज़ाब,अबोध, त्रिदेव, राम-लखन,प्रेम ग्रन्थ, हम आपके हैं कौन, हम तुम्हारे हैं सनम, ये रस्ते हैं प्यार के, दिल तो पागल है, देवदास, अंजाम, कानून अपना अपना, बेटा, दिल, राजा, लज्जा, खलनायक, किशन-कन्हैया, घरवाली-बाहरवाली, कोयला, मृत्युदंड, दीवाना मुझसा नहीं, सैलाब, वर्दी,देवदास, आज नचले, गुलाब गैंग, डेढ़ इश्किया

 

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ

प्रश्न : माधुरी दीक्षितच्या पतिचे नाव काय आहे ? (Madhuri Dixit’s husband name)

उत्तर : श्रीराम माधव नेने (Shriram Madhav Nene)

प्रश्न : माधुरी दीक्षितचे वय किती आहे ? (Madhuri Dixit age)

उत्तर : 54 (In 2022)

 

हे पण वाचा…..

Leave a Comment