क्रेडिट कार्ड म्हणजे काय? | What Is Credit Card?

आज तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली आहे कि, आपण घरबसल्या दैनंदिन जीवनातील कितीतरी कामे करू शकतो. ऑफिसच्या कामापासून ते थेट ऑनलाईन खरेदीपर्यंत तंत्रज्ञान मोलाची भूमिका बजावत आहे. उदा., घ्यायचं झाल्यास आपणांस एखाद्या हॉटेलमधील रूम बुक करायचं झाल्यास कोणत्याही ठिकाणाहून करू शकतो. पण, जेव्हा हे रूम बुक करतो तेव्हा आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कोणत्याही पर्यायांचा वापर करून ऑनलाईन payment करतो. परंतु, यावर आपल्याला फारसी सूट भेटत. म्हणून बॅंकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास क्रेडिट कार्डची (credit card) निर्मिती केली. ऑनलाईन payment केल्यास ग्राहकांना काही सूट वा reward point मिळतात. तर याच क्रेडिट कार्ड विषयी आपण या लेखात माहिती घेणार आहोत.

 

Credit Card
Credit Card

 

क्रेडिट कार्ड म्हणजे काय? | What is credit card?

क्रेडिट कार्ड हे एक बँक किंवा वित्तिय सेवा कंपनीद्वारे जारी केलेला प्लास्टिक किंवा धातुचा पातळ तुकडा असतो. जे कार्डधारकांना उधारी खात्याप्रमाणे कोणतेही बिल भरण्यास परवानगी देते.

 

 

डेबिट आणि क्रेडिट कार्ड वेगळे आहेत का?

हो.

 

डेबिट कार्ड (credit card) हा आपल्या बँक (bank) खात्याची जोडलेला असतो. म्हणून आपण क्रेडिट कार्डद्वारे कोणतेही बिल भरणा केल्यास ती रक्कम आपल्या खात्यातून वजा केली जाते.

 

परंतु, क्रेडिट कार्ड हे आपल्या बँक खात्याची जोडलेले नसते. आणि क्रेडिट कार्ड काढण्यासाठी बँक खात्याची आवश्यकता नसते. जेव्हा आपण क्रेडिट कार्डसाठी अर्ज करतो तेव्हा त्याद्वारे आपण किती रुपयापर्यंत खरेदी करू शकतो याची मर्यादा सेट केलेली असते. म्हणून आपण क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाईन बिल भरणा केल्यास महिन्याभराच बिल संबंधित बँक आपल्या पत्यावर पाठवते. हे बिल दिलेल्या तारखेपर्यंत भरणे अनिवार्य असते नाहीतर दंड (penalty) भरावी लागते.

 

 

क्रेडिट कार्डसाठी कोण अर्ज करू शकतो?

1)वय (age) : वयाची 18 वर्षे पूर्ण असावीत व 60 पेक्षा जास्त नसावे.

See also  CSS म्हणजे काय आणि त्याचा परिचय (What Is CSS In Marathi)

2) राष्ट्रीयत्व किंवा रहिवासी स्थिती (Nationality) : नागरिक, रहिवाशी आणि इतर रहिवाशी क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकतात. परंतु, काही कार्डसाठी त्या त्या बँकानुसार काही नियम वा अटी घालून दिलेल्या आहेत त्याची पूर्तता करणे आवश्यक राहील.

3) वार्षिक उत्पन्न (Annual Income) : अर्जदाराचे किमान वार्षिक उत्पन्न हे 3 लाखांपेक्षा जास्त असावे.

 

नोंद घ्या : हे नियम भारतात लागू आहेत.

 

 

क्रेडिट कार्डचे प्रकार

खरेदिपासुन ते व्यवसाय कर्जापर्यंत अनेक प्रकारचे क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत. परंतु, बऱ्याचजणांना याविषयी माहिती असल्यामुळे या सेवेचा लाभ घेण्यापासून वंचित आहेत. तर भारतात असे किती प्रकारचे क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत ते पुढीलप्रमाणे
1)खरेदी (shopping)
2)इंधन (fuel)
3)प्रवास (travel)
4)Balance transfer
5)Reward

 

 

भरतात कोणत्या बँका क्रेडिट कार्डची सेवा देतात

American Express SBI HDFC Bank
ICICI Bank Citi Bank YES Bank
Standard Chartered Bank IndusInd Bank RBL Bank
Allahabad Bank Andhra Bank Axis Bank
Bank of Baroda Bank of India HBSC Bank
Bank of Maharashtra Canara Bank Indian Bank
Corporation Bank Dhanlaxmi Bank IDBI Bank
Central Bank of India Kotak Mahindra Bank Vijaya Bank
Oriental Bank of Commerce Union Bank of India UCO Bank

 

क्रेडिट कार्डचे फायदे

क्रेडिट कार्डचा वापर काळजीपूर्वक केल्यास आपल्यासाठी फायदेशीर ठरु शकते. त्यातील काही फायदे पुढीलप्रमाणे

 

1)दैनंदिन खर्चाचे व्यवस्थापन (Daily Expenses)

आपण क्रेडिट कार्डचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात अनेक कारणांसाठी करू शकतो. उदा., ऑनलाईन खरेदी, विदयुत वीज बिल भरणा आदी. दैनंदिन जीवनातील खर्चासाठी क्रेडिट कार्डचा वापर केल्याने त्याचा हिशोब ठेवणे सोयिस्कर जाते.

 

2)फसवणूक व चुकांपासून सुरक्षा

डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन payment केल्यास धोक्याचं ठरु शकते. कारण, कार्ड व कार्डची माहिती चोरी झाल्यास आपल्या बँक खात्यावरील रक्कम खाली होऊ शकते. आणि गेलेले पैसे परत येण्यास खूप वेळ लागू शकतो. परंतु, क्रेडिट कार्डच्या बाबतीत असं काही झाल्यास कार्ड ब्लॉक करू शकतो आणि हे सगळं खूप कमी कालावधीत होते.

See also  गावामध्ये सर्वाधिक चालणारे व्यवसाय

 

3)आणीबाणीच्या परिस्थितीत उपयुक्त

क्रेडिट कार्ड आणीबाणीच्या परिस्थितीत खूप फायदेशीर ठरतो.
अशा परिस्थितीत बँक खात्यामधून अधिकचे पैसे वा कर्ज प्रोसेस करण्यासाठी खूप वेळ लागतो. परंतु, क्रेडिट कार्डद्वारे अधिकचे पैसे वा कर्ज प्रोसेस करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.

 

4)क्रेडिट स्कोर (credit score)

आपण क्रेडिट कार्डद्वारे पैसे खर्च करून वेळेत बिल भरणा केल्यास चांगले क्रेडिट स्कोर मिळू शकतात. आणि क्रेडिट स्कोर भविष्यात आपणाला व्यवसाय (business) वा कर्ज (loan) घ्यायचं झाल्यास उपयुक्त ठरतात.

 

 

हे पण वाचा…..

 

2 thoughts on “क्रेडिट कार्ड म्हणजे काय? | What Is Credit Card?”

  1. You actually make it appear so easy together with your presentation but I to find this topic to be really something which I believe I’d by no means understand. It kind of feels too complex and extremely vast for me. I’m taking a look ahead to your subsequent put up, I will attempt to get the hang of it!

    Reply

Leave a Comment