पिनकोडची माहिती मराठीमध्ये

आज इंटरनेटच्या युगात बहुतकरून लोक पारंपरिक पत्रव्यवहार फारच कमी प्रमाणात करत आहेत. त्याऐवजी लोक ई-मेलचा (Email) वापर करताना दिसत आहेत. परंतू, आता आणि अगोदरही पत्रव्यवहार करण्यासाठी वापरली जाणारी एकमेव गोष्ट म्हणजे पिनकोड होय. ज्यामुळे आपण पाठवलेले पत्र योग्य त्या पत्त्यावर पोहोचण्यास मदत होते.

 

जरी या टेकनॉलॉजिच्या युगात लोक पत्र व्यावहारासाठी ई-मेलचा वापर वाढत आहे, तरीही आज असे काही क्षेत्रे आहेत तेथे पिनकोडला प्राधान्य दिले जाते. उदा. कुरिअर कंपनीज (DHL, DTDC, FedEx, BLUE DART, etc), फूड डिलिव्हरी कंपनीज (Zomato, Swiggy, etc), आदी. त्यामुळेच, आज या इंटरनेटच्या युगात पिनकोडचे अस्तित्व टिकून आहे. तर आपण आज या लेखामध्ये याच पिनकोड विषयी माहिती घेणार आहोत.

Pincode

पिनकोडची माहिती मराठीमध्ये | Pincode

पिन कोड म्हणजे काय?

Pincode म्हणजे पोस्टल इंडेक्स क्रमांक. ई-मेल आल्यामुळे पोस्टाद्वारे पत्रव्यवहार फारच कमी झाला आहे, त्यामुळे पिन कोडचा वापरही मर्यादित झाला. परंतु, कुरिअर सर्व्हिसेसने पिन कोड वापरण्यास सुरुवात केल्यापासून, पिन कोडचे अस्तित्व टिकून आहे.

 

 

पिनकोडचा शोध कोणी व कधी लावला?

पिनकोड प्रणालीचा शोध हा एका भारतीयाने लावला आहे. ती व्यक्ती म्हणजे श्रीराम भिकाजी वेलणकर होत. खरंतर वेलणकर केंद्रीय दळणवळण मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून काम करत होते, तेव्हाच त्यांना या पिनकोडबद्दल कल्पना सुचली. आणि या पिन कोड प्रणालीची अंमलबजावणी १५ ऑगस्ट १९७२ साली करण्यात आली.

 

 

पिनकोड प्रणालीची गरज का भासली असावी?

पहिले कारण म्हणजे, देशभरातील विविध ठिकाणांच्या नावांच्या डुप्लिकेशनमुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे अशा यंत्रणेची गरज भासू लागली. आणि दुसरे म्हणजे मेल्सचे वर्गीकरण सुलभ करणे, मेल ट्रान्समिशन आणि डिलिव्हरीचा वेग वाढवणे होय.

 

पिनकोड काम कसं करत?

Pincode हा अतिशय उपयुक्त क्रमांक आहे. 6 संख्या एकत्र करून तयार केलेला हा कोड तुमच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती देतो. त्यातील प्रत्येक क्रमांक केवळ एका विशिष्ट क्षेत्रासाठी बनविला जातो. या माहितीच्या मदतीने पोस्ट ऑफिसचे लोक पॅकेट योग्य ठिकाणी पोहोचवतात. आपला संपूर्ण देश 6 विशेष झोनमध्ये विभागलेला आहे. यात प्रादेशिक आणि कार्यात्मक क्षेत्रांचा समावेश होतो. आणि हाच पिन कोड विशिष्ट क्षेत्राबद्दल माहिती देतो.

See also  टॉप 10 डिजिटल प्रॉडक्ट्स इन 2022

 

 

पिनकोडमधील संख्यांचे विश्लेषण

जर तुमच्या पिनकोडचा पहिला क्रमांक 1 असेल तर याचा अर्थ तुम्ही दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश किंवा जम्मू आणि काश्मीर यापैकी कोणत्याही राज्यातील आहात. जर ही संख्या 2 असेल तर तुम्ही उत्तर प्रदेश किंवा उत्तरांचलचे आहात. त्याचप्रमाणे, जर तुमच्या पिन कोडचा पहिला क्रमांक 3 असेल, तर तुम्ही राजस्थान किंवा गुजरातच्या पश्चिम विभागातील आहात. ४ क्रमांकाने सुरू होणारा पिन कोड हा महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा आहे. त्याचप्रमाणे 5 ने सुरू होणारा कोड आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा आहे.

 

जर तुमचा पिन कोड 6 ने सुरू होत असेल तर तुम्ही केरळ किंवा तामिळनाडूचे आहात. आता जर तुमच्या पिन कोडचा पहिला क्रमांक 7 असेल तर तुम्ही पूर्व विभागातील आहात. यामध्ये वेस्ट-बंगाल, ओरिसा आणि पूर्वोत्तर राज्यांचा समावेश होतो. जर तुमच्या पिन कोडचा पहिला क्रमांक 8 असेल, तर तुम्ही बिहार किंवा झारखंडमध्ये राहता असा संकेत आहे. आणि जर तुमचा पिन कोडं 9 क्रमांकापासून सुरू होत असेल, तर तुम्ही फंक्शनल झोनमध्ये राहत असणार. म्हणजेच हा पिन कोड आर्मी पोस्टल सर्व्हिसेससाठी आहे.

 

 

कोणत्या राज्याचा पिन कोड आहे हे कसं ओळखावे?

आता पहिल्या क्रमांकाबद्दल झाले आहे, आता पिन कोडच्या पहिल्या दोन क्रमांकांबद्दल बोलूया. दिल्लीसाठी 11, हरियाणासाठी 12-13, पंजाबसाठी 14-16, हिमाचल प्रदेशसाठी 17, जम्मू-काश्मीरसाठी 18 आणि 19, उत्तर प्रदेश आणि उत्तरांचलसाठी 20-28, राजस्थानसाठी 30-34, गुजरातसाठी 36-39, 40- 44 महाराष्ट्र, 45-49 मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, 50-53 आंध्र प्रदेश, 56-59 कर्नाटक, 60-64 तामिळनाडू, 67-69 केरळ, 70-74 बंगाल, 75-77 ओडिशा, 78 आसाम, 79 उत्तर पूर्व क्षेत्र, 80 -85 बिहार आणि झारखंड, 90-99 आर्मी पोस्टल सेवा.

 

पिन कोडचे पुढील 3 अंक तुमचे पॅकेट जिथे पोहोचायचे आहे ते क्षेत्र दर्शवतात. म्हणजे तुमचे एखादे पत्र पोस्टाद्वारे तेथील प्रादेशिक पोस्ट ऑफिसमध्ये आले कि, तेथून ते तुमच्या घरी पोहोचवले जाते. आता तुम्हांला समजले असेलच की पिन कोड किती महत्त्वाचा आहे ते.

See also  महाराष्ट्रातील सण व उत्सव माहिती

 

हे पण वाचा . . . . .

1 thought on “पिनकोडची माहिती मराठीमध्ये”

Leave a Comment