दूरदर्शनची माहिती मराठीमध्ये | Television Information

आधुनिक युगातील महत्वपूर्ण आविष्कारापैकी एक म्हणजे टेलीविजन (Television) चा शोध होय. टेलीविजनला मराठीमध्ये दूरदर्शन असे म्हणतात. कारण, त्याद्वारे आपल्याला दूरच्या वस्तूंचे दर्शन होते. दूरदर्शनवरील दृष्ये पाहून आपल्याला असा भास होतो कि, घटना आपल्यापासून दूर नाही तर त्या आपल्या डोळ्यांसमोरच घडत आहेत.

 

दूरदर्शन जे आज प्रत्येक श्रीमंत-गरिबाच्या घरापर्यंत पोहोचले आहे. लोकांचे मनोरंजन करणारे व देश-विदेशातील घडामोडीं सांगणारे हे उपकरण आज खूप लोकप्रिय झाले आहे.

Television
Television

 

टेलिव्हिजनचा शोध जे.एल.बेयर्डने (J. L. Baird) या वैज्ञानिक लावला. सुरुवातीच्या काळात टेलेव्हीजनवर आपण फक्त काळे-पांढरे चित्रच बघू शकत होतो. पण, आता त्यावर रंगबिरंगे चित्रे बघू शकतो. जशी वस्तू मूळ स्वरूपात आहे त्याच स्वरूपात ती आपल्याला टेलेव्हीजनवर पाहता येते.

 

 

टेलिव्हिजनचे प्रमुख घटक

टेलेव्हीजन कार्य करण्यासाठी काही घटकांची आवश्यकता असते. त्यात सहसा, विडिओ, ऑडिओ, ट्रान्समीटर, रिसिव्हर, डिस्प्ले डिवाइस असे घटक समाविष्ठ असतात.

विडिओ | Video

टेलिव्हीजनवर दिसणारी रंगबिरंगे हलणारी चित्रे म्हणजे वीडियो होय. टीव्ही शो, न्यूज प्रोग्राम, चित्रपट यांचा समावेश विडिओ मध्ये होतो.

 

ऑडिओ | Audio

टिव्हीवर फक्त आपण विडिओच पाहत बसलो तर ते कंटाळवाणं होणार त्यासाठी वैज्ञानिकाने विडिओबरोबर ऑडिओचिही व्यवस्था केली आहे. त्यामुळेच टेलीविजनवरील संभाषण ऐकण्यासाठी आपल्याला  कोणत्याही बाह्य उपकरणाची गरज भासत नाही.

ट्रान्समीटर | Transmitter

ट्रान्समीटर हे एक असं डीवाइस आहे कि त्याद्वारे विद्युत सिग्नल ट्रान्समीट केला जातो. सिग्नल ऑडिओ किंवा विडिओ यापैकी कोणताही असो. दोन्हि ऑडिओ आणि विडिओ सिग्नल विद्युत स्वरूपात असून ते रेडिओ लहरींमध्ये प्रसारित होतात त्यानंतर ते रिसिव्हरद्वारे रिसिव्ह केले जातात. ट्रान्समीटर केवळ एकच ऑडिओ आणि विडिओ प्रसारित करत नाही तर तो एकाचवेळी या प्रकारचे अनेक चॅनेल्स प्रसारित करत असतो.

डिस्प्ले डिवाइस | Display Device

डिस्प्ले डिवाइस सामन्यतः एक टीव्ही सेट असतो. डिस्प्ले डिवाइस विद्युत सिग्नल रिसिव्ह करण्यास सक्षम असतो आणि ह्या विद्युत सिग्नल्सचे रूपांतरण चित्राच्या स्वरूपात होऊन डिस्प्लेवर प्रकाशित होतात. बहुतेक टीव्ही सेटमध्ये कॅथोड रे ट्यूब (cathod-ray-tube) समाविष्ट केले जाते, परंतु नवीन डिस्प्ले उपकरणांमध्ये एलसीडी प्लाझामा डिस्प्लेसारख्या उपकरणांचा समावेश असू शकतो.

See also  क्रेडिट कार्डचे प्रकार | Types of Credit Card

 

 

टीव्ही सिग्नल्स प्राप्त करण्याचे मार्ग

टीव्ही सिग्नल्स दूरदर्शन, केबल आणि उपग्रह या तीन मार्गांनी प्राप्त करता येतात.

दूरदर्शन (Television)

दूरदर्शन प्रसारण सहसा दूरदर्शन सिग्नल्स म्हणून पारिभाषित केले जातात जे पृथ्वीवरुन ट्रान्समिशन टॉवरद्वारे प्रसारित केले जातात. बहुतेक दुरदर्शन चॅनेल्स मोफत असतात आणि ते कोणीही घेऊ शकतो. त्यामध्ये पारंपारिक(मातृभाषेत) दूरदर्शन चॅनेल्स (television Channels) समाविष्ट असतात.

केबल (Cable)

दूरदर्शन प्रसारण प्राप्त करण्याचा केबल टीव्ही हा दुसरा मार्ग आहे. टीव्ही सिग्नल्स हे हवेतून प्रसारित करण्याऐवजी ते एका बिंदूत संकलित केले जातात आणि केबल कंपनीकडून केबलद्वारे थेट आपल्या घरी पाठवले जातात. टेलिफोन जोडणीसाठी आपल्या घरापर्यंत जशी टेलिफोन लाईन टाकली जाते त्याचप्रमाणे केबल टीव्ही देखील.

उपग्रह (Satellite)

उपग्रहांद्वारे टीव्ही सिग्नल्स प्रसारित करणे हा एक वेगळाच प्रकार आहे. जमिनिवरुन सिग्नल्स प्रसारित करण्याऐवजी पृथ्वीभोवती फिरत असलेल्या उपग्रहांद्वारे केले जातात. उपग्रहांद्वारे प्रसारित केलेले सिग्नल्स हे सहसा डिजिटल स्वरूपात संकुचित केलेले असतात. हे सिग्नल्स रिसिव्ह करण्यासाठी आपल्या घराच्या छप्परावर बसवलेला विशेष अँटेना तुम्ही पहिला असेलच. नंतर ते सेटअप बॉक्सद्वारे आपल्या टीव्हीपर्यत पोहोचतात आणि आपण विविध कार्यक्रमांचा लाभ घेतो.

तुम्हांला हा लेख कसा वाटला ते कंमेंट बॉक्समध्ये कंमेंट करून जरुर सांगा.

 

हे पण वाचा…..

 

2 thoughts on “दूरदर्शनची माहिती मराठीमध्ये | Television Information”

  1. I may need your help. I’ve been doing research on gate io recently, and I’ve tried a lot of different things. Later, I read your article, and I think your way of writing has given me some innovative ideas, thank you very much.

    Reply

Leave a Comment