इंटरनेट म्हणजे काय? | What is an internet?

इंटरनेट ही एक अशी सुविधा आहे की, त्यामुळे आपण जगाशी संपर्क साधू शकतो आणि माहितीची देवाण – घेवाण करू शकतो. आज आपली कितीतरी कामे हि इंटरनेटवर अवलंबून आहेत त्याच्याशिवाय आपलं काहीच चालत नाही.

 

इंटरनेटमूळे आपला कितीतरी कामांमध्ये लागणारा जास्तीचा वेळ वाचला. जेव्हा इंटरनेट सेवा उपलब्ध नव्हती तेव्हा आपल्याला एखादे तिकीट जरी बुक करायचं असल्यास त्या संबंधित बुकिंग कार्यालयापर्यंत जावं लागायचं, त्याबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही. तर इंटरनेट सेवेमुळे या सगळ्याचा त्रास कमी झाला. तिकीट बुकींग हे एक उदाहरण झाल, अशी बरीचशी उदाहरणे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आहेत कि, ती इंटरनेटशिवाय होऊ शकत नाही.

 

सध्या इंटरनेट सेवा हि एक काळाची गरज बनून राहिली आहे. तर हि इंटरनेट सेवा आपल्यापर्यंत कशी पोहचते आणि तिचे कार्य थोडक्यात समजून घेऊ या.

Internet
Internet

 

इंटरनेट म्हणजे काय? | What is internet?

इंटरनेट हे एक मोठे नेटवर्क आहे. त्यामुळे जगातील सर्व संगणक एकमेकांशी जोडले जातात. इंटरनेटमूळे लोक माहितीची देवाण-घेवाण करतात आणि जगातील कोणत्याही स्थानावरुन एकमेकांशी संवाद साधतात.

 

 

इंटरनेटचा शोध कोणी व कधी लावला?

इंटरनेटचा शोध कोणी एका व्यक्तीने लावला असं म्हणणे चुकीचे ठरेल. कारण इंटरनेट शोधासाठी अनेक महत्वपूर्ण संघटनांनी विविध प्रकारे कार्य केले आहे. त्यांच्यामधील एका व्यक्तीचे नाव घेतो ते म्हणजे रॉबर्ट डब्लू टेलर (Robert W. Taylor) यांनी ARPANET (An early Prototype of the Internet) विकसित करणाऱ्या संघटनेचे नेतृत्व केले होते. आणि Vinton Cerf व Robert Kahn यांनी ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल (Transmission Control Protocol) / इंटरनेट प्रोटोकॉल (Internet Protocol) विकसित केलं. ह्या सगळ्या घडामोडी 1980 च्या दशकात घडत होत्या.

 

पण, प्रत्यक्षात आपल्याला इ.स. 1 जानेवारी 1983 अधिकृतपणे इंटरनेटचा वापर करण्यास मिळाला.

 

 

इंटरनेट कार्य कसा करतो?

दोन किंवा त्यापेक्षा जास्त संगणकांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी इंटरनेटची गरज भासते, ते आपण वरील परिछेदात पाहिलं आहे. पण, प्रत्येक संगणकाला वायरद्वारे जोड़ने खूप अवघड होणार. त्यासाठी ठराविक अंतरावर राउटर (Router) आणि स्विचिंग (Switching) अशा प्रकारची डेटा वाहून नेणारी उपकारने जोडलेली असतात. त्यामुळेच आपण जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील आपल्याला हवी असलेली माहिती एका क्लिकवर मिळवू शकतो.

See also  www काय आहे? | What is www?

 

आपण एक उदाहरण घेऊन समजुया, असं गृहीत धरुया कि मला तंत्रज्ञानाविषयी हवी असल्यास मी ते गूगल किंवा अन्य कोणत्याही सर्च इंजिनवर टाईप केले तर त्याविषयी मला सगळी माहिती मला मिळेल.

 

 

पण, ते सर्च इंजिनवर आलं तरी कसं?

जेव्हा कोणीही लेखक (Writer) एखाद्या विषयाबद्दल माहिती इंटरनेटवर प्रसारित करतो, तेव्हा ती माहिती एका सर्व्हरवर (Server) संग्रहित केलेली. सर्व्हर आणि सर्च इंजिन हे एकमेकांशी अंतर्गत जोडलेले असतात. त्यामुळे तुम्हाला हवी असलेली माहिती सर्च इंजिन सर्व्हरवर उपलब्ध असलेली माहिती तुमच्यासमोर प्रदर्शित करतो. जर सर्व्हरवर तुम्हांला हवी असलेली माहिती उपलब्ध नसेल तर सर्च इंजिन “याविषयी माहिती उपलब्ध नाही (Not Found)” असा संदेश प्रदर्शित करतो.

 

तुम्हांला हा लेख कसा वाटला ते कंमेंट बॉक्समध्ये कंमेंट करून जरुर सांगा.

 

हे पण वाचा…..

Leave a Comment