पूर्वीच्या काळी स्वयंपाकासाठी मातीचा स्टोव्ह वापरला जात असे. मातीचा स्टोव्ह म्हणजेच मातीची चूल होय. आजही भारतातील खेड्यांमध्ये ह्या मातीच्या चूली पाहायला मिळतात. मातीच्या चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी कोळसा किंवा लाकूड वापरला जातो. गावात म्हशी (buffalo), गाय (cow), बैल (ox) यासारख्या पाळीव जनावरांचे शेण लहान रोट्यांमध्ये बनविले जाते आणि वाळवले जाते, ज्यास गोवऱ्या म्हणतात. तुमच्यातील जे कोणी गावी राहिले किंवा कधी सुट्टीसाठी गावी गेलेल्यांना नक्कीच याची माहिती असेल.
मातीच्या चूलीचा वापर स्वयंपाक बनविण्यासाठी केल्यामुळे बरेच प्रदूषण होते. अशात तंत्रज्ञानाचा विकास होत असताना मानवाला एक वायू सापडला ज्यावर स्वयंपाक केल्याने प्रदूषण होत नाही. या वायूच्या साहाय्याने स्वयंपाक बनविण्यासाठी मातीच्या चूलीच्या तुलनेत खूप कमी वेळ लागतो. आजच्या काळात स्वयंपाकासाठी सर्वत्र एलपीजी गॅस (LPG : liquefied petroleum gas) वापरला जात आहे. एलपीजी गॅसवर स्वयंपाक केल्याने वेळ आणि मेहनत दोन्हीची बचत होते.
भारतात स्वयंपाकाचा गॅस (Gas) पुरवणार्या बर्याच कंपन्या आहेत. प्रदूषण कमी करता येईल यासाठी भारत सरकार लोकांना गॅसवर स्वयंपाक करण्यास आवाहन करत आहे. आजच्या युगात, अशी कोणतीही व्यक्ती उरली नसेल जिने गॅस (Gas) सिलेंडर पाहिला नसेल. जेव्हा आपण सिलेंडर(gas cylinder) पाहतो तेव्हा आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो आणि तो म्हणजे – गॅस सिलेंडरचा रंग लाल का असतो, दुसरे इतर रंग का नाही?
गॅस सिलिंडरचा रंग लाल असण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत
पहिले कारण
लाल रंग हा धोक्याचे चिन्ह आहे. आपण वापरत असलेले गॅस सिलेंडर्स अत्यंत ज्वलनशील असतात. या वायूने स्वयंपाक करणे जितके धोकादायक आहे तितकेच सोपेही आहे. एलपीजी गॅस जलद गतीने पेट घेतो त्यामुळे अनर्थ होण्याचा धोका संभवतो. धोका टाळण्यासाठी याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे.
दुसरे कारण
लाल रंग असल्याने सिलिंडरमध्ये एलपीजी गॅस असल्याची खात्री मिळते. ज्यामुळे कोणत्या सिलिंडर कोणता गॅस भरला आहे हे समजण्यासाठी वायूंचे सिलिंडर वेगवेगळ्या रंगांनी रंगविले जातात आणि त्यांचा आकारही वेगवेगळा ठेवला जातो. अशाच काही वायूंचे सिलिंडर आणि त्यांना देण्यात येणारे रंग खालीलप्रमाणे:
वायूचे सिलेंडर (Gas Cylinder) | (Color) |
---|---|
हीलियम (Helium) | तपकिरी (Brown) |
नायट्रोजन (Nitrogen) | काळा (Black) |
ऑक्सिजन (Oxygen) | पांढरा (White) |
कार्बन डायऑक्साईड (Carbon Dioxide) | राखाडी (Gray) |
नायट्रस ऑक्साईड(Nitrous Oxide) | निळा(Blue) |
सिलेंडरचा रंग पाहून सिलेंडरच्या आतला वायू सहजपणे ओळखला जाऊ शकतो, म्हणून त्यास वेगवेगळ्या रंगांनी रंगविले जातात.
वरील परिछेदात दिलेल्या स्पष्टीकरणावरुन तुम्हांला प्रश्न पडला असेलच, स्वयंपाक गॅस सिलिंडरचा रंग लाल का आहे? स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा रंग लाल होण्याची दोन मुख्य कारणे आहेत, प्रथम ते धोक्याचे सूचक आहे आणि दुसरे म्हणजे सिलेंडरच्या आत असलेल्या गॅसची ओळख पटणे शक्य होते.
Reading your article helped me a lot and I agree with you. But I still have some doubts, can you clarify for me? I’ll keep an eye out for your answers.