कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर | Technology & Agriculture

जगभरात बहुतांश लोकांच्या उपजीविकेच साधन म्हणजे ‘अन्न‘ होय. पण हे अन्न आपल्या जेवणाच्या ताठात येइपर्यत शेतकरी मित्राला अपार मेहनत घ्यावी लागते. तर शेती या विषयावर न्युज चॅनेल्स, न्युज पेपर आणि इतर बऱ्याचशा माध्यमांद्वारे नेहमीच चर्चा होत असते.

 

मागील काही वर्षांमध्ये शेती करण्याच्या पद्धतींत व त्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रांमध्ये बदल करण्यात आले आणि ते यशस्वीही झाले. उदाहरणार्थ, आजकाल पिकांच्या वाढीसाठी अजैविक खते, कीटकनाशकांचा कमी प्रमाणात वापर व मशागत आणि इतर अन्य कारणांसाठी ट्रॅक्टर व ऍग्री मशीन्सचा वापर होताना दिसतो.

 

अशा साधनांचा वापर कृषी उत्पादन सुधारण्यासाठी आणि होणारा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने नैसर्गिक संसाधनांचा वापर वाढत आहे. तर कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास त्याचे फायदे आपल्या शेतकरी मित्राला कसे होतील याची एक झलक या लेखात पाहू या.

Technology In Agriculture
Technology In Agriculture

 

शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर

शेतीत तंत्रज्ञानाचा उपयोग विविध कारणांसाठी केला जाऊ शकतो, जसे वनौषधि, कीटकनाशके, खते आणि सुधारित बियाणे इत्यादी. नजिकच्या वर्षात तंत्रज्ञानामुळे शेती उत्पादनात झालेली भरभराट हे त्याचे प्रमाण आहे.

 

तंत्रज्ञानामुळे ज्या भागांमध्ये पिकांची वाढ होऊ शकणार नाही असा अनुमान काढण्यात येत होता, तेथे पिकांची वाढ पूर्ण क्षमतेने होत आहे. या प्रक्रियेमध्ये अनुवंशिक अभियांत्रिकीद्वारे पिकांच्या जनुकांमध्ये काही विशिष्ठ गुणधर्मांचा समावेश केला जातो, यामुळे पिकांवरील कीड आणि व दुष्काळाचा प्रतिकार करण्यास पिकांना मदत होते.

 

हे मात्र खरं आहे कि,”तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या शेतीची उत्पादन क्षमता जास्त असते”. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर काही मर्यादा आहे त्याही शेतकरी मित्रांनी समजून घेतल्या पाहिजेत. मर्यादांमध्ये सामाजिक व अर्थिक अशा दोन घटकांचा समावेश होतो.

 

आर्थिक घटक : भुमिचा आकार, खर्च आणि तंत्रज्ञानाचे फायदे अथवा तोटे
आर्थिक घटक हे कृषी तंत्रज्ञान अवलंबण्याचे दर निर्धारित करतात.

See also  वायरलेस उपकरणांचे प्रकार?

 

सामाजिक घटक : शेतकऱयांची शैक्षणीक पातळी, वय, सामाजिक गट आणि लिंग
जरी वरील घटक कृषी तंत्रज्ञान अवलंबन्यावर परिणाम करत असतील, तरी शेतकरी मित्रांनी याबद्दल संबंधित जानकारांशी चर्चा करून जास्तीत जास्त तंत्रज्ञान अवलंबण्यावर भर दिला पाहिजे.

 

शेवटी आपला कल हा शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन घेऊन नफा कमविणे आहे. तर तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये कसा करता येईल हे थोडक्यात पाहू या.

फार्म मशीन्स

आजकाल शेतकरी मित्रांसमोर एक अनोखी समस्या आहे ती म्हणजे शेतीच्या कामासाठी मजूर मिळवीने आणि त्यांची वाढती मजुरी होय. कारण वेळेवर मजूर मिळाले नाहीत तर हंगामी पिकांची लागवड, कापनी आदी कामांवर परिणाम होतो. त्याला एक उत्तम पर्याय म्हणून कृषी क्षेत्रात फार्म मशीन्स विकसित केल्या गेल्या आहेत. या मशिन्स आपल्या शेतकरी मित्राला लागवडीपासुन ते थेट कापनीपर्यत अशा सर्व प्रकारे मदत करतात. आणखी एक म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून कमी जास्त उत्पादन घेणे शक्य होते.

पीक सेन्सर्स

कृषी क्षेत्रात खतांचा आणि किटकनाशकांचा वापर प्रभावीपणे करणे गरजेचे असते. विशेषता जेव्हा शेतामध्ये शेतकऱ्याने वेगवेगळ्या पिकांची लागवड केली असल्यास त्यांना लागणारे खत – पाणी कधी व केव्हा द्यावे या सगळ्या संभ्रमात शेतकरी असतो. जर शेतकऱ्याने पीक सेन्सर्सचा वापर आपल्या शेतामध्ये केल्यास पिकांना आवश्यक तेवढेच खत व पाणी देणे सुलभ होते. पीक सेन्सरमुले पिकांचे अनावश्यक होणारे नुकसान टळते आणि त्याचा फायदा शेतकरी मित्राला होतो.

जीपीएस टेक्नोलॉजी

जीपीएस टेक्नोलॉजीमूळे पिकांची सद्य स्थिती कोणत्याही ठिकाणाहुन जाणून घेता येते. यामुळे पिकांचे डिजिटली दस्ताऐवजीकरन(डॉक्यूमेंटेशन) करणे सोपे जाते. जिपिएसच्या माध्यमातून शेतकरी शेतातून किती उत्पन्न मिळेल याचा अंदाज घेऊ शकतो. या डेटाच्या आधारे शेतकरी शेतीसंबधी अचूक निर्णय घेऊ शकतो.

जैवतंत्रज्ञान(Biotechnology)

जैवतंत्रज्ञानाला अनुवांशिक अभियांत्रिकी आणि पिकांचे जनुकिय सुधारणा प्रकिया म्हटले जाते. बहुधा अनुवांशिक प्रक्रिया पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याकरता केली जाते. जैवतंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी कोरड्या किंवा वाळवंटी समजल्या जाणाऱ्या भागातही पिकांची लागवड करू शकतात.

See also  डोमेन नेम म्हणजे काय? | Domain Name

 

शेवटी मी एवढच सांगू शकतो कि,शेतकरी मित्रांनी शेती तंत्रज्ञान अवलंबण्यापुर्वि काही विशेष बाबींचा विचार करने गरजेचे आहे. त्यामध्ये खत, सिंचन, सघन शेती आणि इतर नैसर्गिक स्त्रोतांचा वापर कसा करावा याचे नियोजन. आणि तंत्रज्ञानाचा वापर कधी, कोठे व किती प्रमाणात केला पाहिजे आणि त्याचे आपल्याला होणारे फायदे व तोटे याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. धन्यवाद!

 

हे पण वाचा…..

Leave a Comment