कृत्रिम बुद्धिमत्ता | Artificial Intelligence

आजकाल विज्ञानामध्ये वारंवार चर्चेत असणारा विषय म्हणजे Artificial Intelligence होय. त्यालाच मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संक्षिप्त रुपात AI असे म्हटले जाते. कृत्रिम बुद्धिमत्तेमूळे माणसाच्या कौशल्यामध्ये भर तर पडलीच आणि त्याचबरोबर मानवी संस्कृतीच्या स्थापनेमध्ये देखील मदत झाली. आजकाल माणसाने तंत्रज्ञानामध्ये जी प्रगती केली आहे, त्यामध्ये मानवी कौशल्याचा खारीचा वाटा आहे.

 

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर माणसाने आज सर्वच क्षेत्रांमध्ये कितीतरी नवनवीन आविष्कार केले आहेत. जवजवळ सगळ्याच आविष्कारामुले माणसाच्या जीवनाला नवीन दिशा मिळाली. जेव्हा संगणकाचा शोध लागला तेव्हा विचारसुद्धा केला नव्हता कि भविष्यात आपण स्मार्ट फोनचा वापर करू. पण, आज स्मार्ट फोन आपल्या जीवनाचा भागच नाही तर आपल्याला आपल्या कामामध्ये देखील मदत करत आहे.

 

मागच्या काही वर्षांमध्ये संगणक शास्त्रज्ञांनी दुनियेसमोर ai सारखी संकल्पना मांडली. ज्याचा मुख्य उद्देश होता कि संगणक तंत्रज्ञानाचा वापर करून अशी मशीन विकसित करायची, कि ती मशीन मानव करत असलेली सगळी कामे करेल.  उदा. बोलू शकेल, चालू शकेल, काम करू शकेल, शिकू शकेल आदी.

 

परंतु काही वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे, जर याप्रकारच्या मशीनचा शोध लागला आणि त्यांच्यावर आपलं नियत्रंण नसेल तर अशा मशीन्स सुपर इंटेलिजन्ट बनतील आणि त्या पुढे जाऊन मानवी अस्तित्वाला धोकादायक ठरेल. AI मशीन आपल्यासाठी किती उपयोगी ठरतील हे भविष्यात समजेलच. ते काहीही असो पण सदरच्या लेखात आपण ai बद्दल थोडक्यात जाणून घेऊ या.

Artificial Intelligence

 

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) म्हणजे काय ?

AI म्हणजे कॉम्पुटर सायन्स द्वारे विकसित केलेली एक मशीन होय. माणसासारख्या दिसणाऱ्या या मशीन ला कॉम्पुटर प्रोग्रामिंगचा वापर करून असं विकसित केलंय कि ती माणसाप्रमाणे बोलू शकते, चालू शकते, कामही करू शकते. आणि महत्वाचं म्हणजे एखादया समस्येवर विचार करून उपाय सुचवू शकते.

 

 

AI ची सुरुवात कधी झाली ?

1960 च्या दशकात काही कॉम्प्युटर सायंटिस्टच्या मनात असा विचार येत होता कि “आपण एखादी अशी मशीन बनवू शकतो का? कि ती माणसाप्रमाणे बोलू शकेल, चालू शकेल, कामही करू शकेल”. प्रथमच 1955 मध्ये जॉन मॅककार्थी (John McCarthy) या अमेरिकन कॉम्प्युटर सायंटिस्टने ai चा शब्दप्रयोग केला. त्यानंतर 1956 मध्ये एका कॉन्फरेन्समध्ये जॉन मॅककार्थीने ai बद्दल घोषणा केली आणि तेव्हापासून त्याच्यावर विचारसरणी सुरु झाली. म्हणून जॉन मॅककार्थी AI चा जनक म्हणतात.

See also  CSS म्हणजे काय आणि त्याचा परिचय (What Is CSS In Marathi)

 

 

AI ची काही उदाहरणे

1) स्मार्ट कार आणि ड्रोन (Smart Car & Drone)

काही वर्षांपूर्वी पूर्ण स्वयंचलित कार वापरणे एक स्वप्न होते, पण आता टेस्लासारख्या काही कंपन्यांनी इतकी प्रगती केली आहे कि आपल्याकडे आधीपासूनच अर्ध-स्वयंचलित चारचाकी रस्त्यावर धावत आहेत. ऍमेझॉन आणि वॉलमार्ट सारख्या कंपन्या ड्रोन निर्मितिवर भर देउन ते यशस्वीही करून दाखविले आणि त्याची कितीतरी उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत.

 

उदा., आज जगभरातिल अनेक छोटे मोठे देश आपल्या सैन्यदलामध्ये ड्रोन वापर करताना दिसतात. हल्ली काही वर्षांमध्ये टेस्लाने AI चा वापर करून पुर्ण स्वयंचलित कारहि बाजारात आणली आहे. पूर्ण स्वयंचलित म्हणजे तिला वाहन चालकाची गरज नसते.

 

2)गूगल मॅप (Google Map)

आपल्याला माहित आहे कि AI आपल्या जीवनावर दररोज परिणाम करत आहे. अजून एक म्हणजे गूगल मॅप ज्याचा वापर अनेक लोक प्रवासादरम्यान करतात. त्यामध्ये नेव्हिगेशनच्या मदतीने गूगल मॅप आपल्याला रस्त्या दाखवण्याचे काम करतो. पण वास्तविक रहदारीसंबधी मिळालेल्या डेटाचं स्पष्टीकरण देण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करतात.

 

उदा., आपण जेव्हा उबेर किंवा ओलाकडे राईडची मागणी करतो तेव्हा AI आपल्या मागणीनुसार आपली राइड निश्चित करत असते. आपण निश्चित ठीकाणी पोहोचेपर्यंत AI महत्वाची भूमिका बजावत असते.

 

3)आरोग्य सेवा (Healthcare Service)

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराणे आरोग्य सेवेला एक नवीन आयाम दिला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमूळे रोग आणि त्याच्यावर उपचार शोधणे थोडेसे सोपे झाले आहे. शिवाय, उपचार आणि व्यवस्थापन प्रक्रिया अधिक सुलभ करण्यामध्ये AI चा मोठ्याप्रमाणात वापर होत आहे. परिणामी, रुग्णालये आणि आरोग्य केंद्रे संशोधनातून रोग शोधण्यापर्यंत सर्वकाही सुलभ व्हावे यासाठी AI टेक्नॉलॉजीवर अधिकाधिक भर देण्यात येत आहे.

 

तुम्हांला हा लेख कसा वाटला ते कंमेंट बॉक्समध्ये कंमेंट करून जरुर सांगा.

 

हे पण वाचा…..

Leave a Comment