एटीएम मशीनची माहिती मराठीमध्ये

ATM जे आज प्रत्येक छोट्या – मोठ्या शहरात पाहायला मिळतात. हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असून त्याचा वापर बँक ग्राहक बँकेतील व्यवहार करण्यासाठी करतात.

 

वापरकर्त्यांना एक विशिष्ट प्रकारचे प्लास्टिक कार्ड दिले जाते. ते कार्ड त्यांना त्यांचे बँक खाते असणाऱ्या बँकेतर्फे देण्यात येते. कार्डमध्ये वापरकर्त्यांच्या बँक अकाउंटची माहिती एका मैग्नेटिक स्ट्रीपमध्ये संग्रहित केलेली असते. त्या स्ट्रीपमध्ये असणाऱ्या ओळखकोडद्वारे ग्राहक त्यांच्या संबंधित बँकशी कनेक्ट होतो आणि पुढील व्यावहार सुरु होतात.

 

ATM मशीन द्वारे आपण कोणत्याही ठीकाणावरुन बँक व्यवहार करू शकतो. त्यासाठी कोणतीही ठराविक वेळ नाही, पण ग्राहकांना पैसे आपल्या बँक खात्यामध्ये जमा किंवा काढून घ्यायचे असल्यास त्यांना बँकेकडून यांसंबंधी काही नियम व अटी दिलेल्या असतात त्यानुसारच ATM द्वारे बँक व्यवहार चालतात.

ATM Machine
ATM Machine

 

ATM म्हणजे काय ?

ATM म्हणजे अशी मशीन जिच्याद्वारे शारीरिकरित्या बँकेमध्ये न  जाता ज्या ठिकाणी कुठे संबंधित ATM असेल तेथून बँक व्यवहार करणे सुलभ होते. ATM द्वारे आपण रोख ठेवी, पैसे काढणे, खात्याची माहिती, ATM पिन बदलणे, बँक खाते आधार क्रमांकाशी जोडने अशी विविध आर्थिक व्यवहारासंबधी कामे करू शकतो. जेणेकरून ग्राहक त्यांच्या वेळेनुसार व्यवहार करू शकतात आणि यासाठी बँक कर्मचाऱ्यांची देखील आवश्यकता भासत नाही.

ATM मशीनचे दोन प्रकार आहेत

एक साधी जिच्याद्वारे आपण पैसे काढू शकतो आणि शिल्लक रकमेचा अहवाल प्राप्त करू शकतो. आणि दुसऱ्या मशीनद्वारे रोख ठेवी जमा करू शकतो व खात्याची माहिती नोदवु शकतो.

ATM चा शोध कधी लागला आणि सुरुवात कोठून झाली ?

ATM ची संकल्पना प्रथम अमेरिका (America), जपान (Japan), युके (UK) आणि स्वीडन (Swidden) या देशांमध्ये उद्धवली. जपानने संगणक कर्जासाठी एक मशीन विकसित केली तिला रोकड पुरवठा करणारी ‘लोड मशीन’ म्हटले गेले. हि मशीन 1966 मध्ये वापरात आली.

See also  वेब होस्टिंग म्हणजे काय? | Web Hosting

 

काही वर्षात, म्हणजे सन 1967 मध्ये ब्रिटनने रोख वितरण मशीन तयार केली. हि मशीन ब्रिटिश आविष्कारक जॉन शेफर्ड – बॅरन यांनी विकसित केली आणि तीचा वापर प्रथमतः उत्तर लंडनमध्ये (london) असणाऱ्या ‘बार्कलेज बँक’ द्वारे करण्यात आला. याच मशीनची संकल्पना घेऊन आजचे ATM विकसित झाले आहेत. म्हणूनच जॉन शेफर्ड – बॅरनला ATM मशीनचा निर्माता म्हटले जाते.

 

पण, भारतात ATM चा विकास हा 1990 च्या सुरुवातीस सुरु झाला आणि त्यासाठी परदेशी बँकांमार्फत मदतही केली गेली. भारतात, बँकशाखा मजबूत नसल्यामुळे बँकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे.

 

ATM मशीनमूळे या सर्व समस्यांचे निराकरण झाल्याचे दिसुन आले. त्यानंतर कमी व्यवहार शुल्क आकारुन अरामदायी सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवुन बँकशाखा नेटवर्कमधील अडथळे दूर करण्यासाठी ATM मशीनची विविध ठिकाणी स्थापना केली गेली. काही वर्षात यामध्ये अनेक नवनवीन बदल करून ग्राहक याचा जास्तीत जास्त वापर करतील यावर भर देण्यात आला आणि ते तर आपण पाहताच आहोत.

 

तुम्हांला हा लेख कसा वाटला ते कंमेंट बॉक्समध्ये कंमेंट करून जरुर सांगा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ

Question : atm stands for ?

Answer : Automated Teller Machine

 

हे पण वाचा…..

2 thoughts on “एटीएम मशीनची माहिती मराठीमध्ये”

  1. Very nice post. I just stumbled upon your blog and wanted to say that I’ve really enjoyed browsing your blog posts. In any case I’ll be subscribing to your feed and I hope you write again soon!

    Reply

Leave a Comment