नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात तुम्हांला वॉशिंग मशिनबद्दल माहिती (washing machine mahiti) घेणार अहोत. आपल्या घरामध्ये अशा कितीतरी इलेक्ट्रॉनिक (electronic) वस्तु असतात, ज्या आपल्याला आपल्या दैनंदिन कामामध्ये मदत करतात. ज्यामुळे आपल्या बहुमोल वेळेची आणि अंगमेहनतीची बचत होते.
परंतु, जेव्हा आपण एखादी नवीन वस्तू किंवा उपकरणे घेण्याचा विचार करतो तेव्हा ती वस्तू खरेदी करण्यापूर्वी आपण किती वेळा विचार करतो की कोणता ब्रँड घ्यावा? आपल्या बजत मध्ये येइल का? याशिवाय अनेक प्रश्न आपल्या मनात येतात.
आपण या सगळ्याबद्दल इतर लोकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला आपल्या अशा प्रश्नांची उत्तरे नीट मिळत नाहीत. म्हणून या पोस्टमध्ये, तुम्हाला वॉशिंग मशीनबद्दल तपशीलवार माहिती देण्यात आली आहे जेणेकरून तुम्ही योग्य वॉशिंग मशीन सहज खरेदी करू शकता.
वॉशिंग मशीन म्हणजे काय? | What is Washing Machine?
वॉशिंग मशीन ही आवश्यक घरगुती उपकरणांपैकी एक आहे जी कपडे धुण्यासाठी वापरली जाते. Washing Machine हे विद्युत उपकरण आहे, त्यामुळे कपडे धुण्यासाठी हाताने काम करण्याची गरज नाही. या यंत्रात साबणाचा वापर केला जात नाही, फक्त यू डिटर्जंट वापरला जातो आणि कपड्यांमधून सर्वात हट्टी घाण पूर्णपणे साफ केली जाते. खूप व्यस्त म्हणजेच नोकरी करनार्या लोकांसाठी वॉशिंग मशीन खूप फायदेशीर आहे.
जेव्हा तुम्ही कपडे धुता तेव्हा तुम्हांला वॉशिंग मशिनच्या ड्रममध्ये पाण्याने भरलेले डिटर्जंट टाकावे लागते आणि त्यामध्ये कपडे घालुन स्वीच चालू करावा. बाकी काम मशीन स्वतःच करते. वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुण्याच्या वेळी थांबावे लागत नाही, मशीनमध्ये कपडे टाकून तुम्ही इतर कामही करू शकता.
कपडे धुण्याचे काम झाल्यावर मशीन तुम्हांला अलार्मने सुचीत करते. त्यामुळे तुम्हीं एकाच वेळी दोन गोष्टी करू शकता.
वॉशिंग मशीन कार्य कसे करते?
वॉशिंग मशिनमध्ये अनेक प्रकारचे स्विच असतात ज्यांच्या मदतीने तीला ऑपरेट केले जाते.
सर्व प्रथम, कपडे धुण्यासाठी ड्रममध्ये पाणी ताकावे लागते, त्यासाठी ड्रममध्ये इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या आणि एकेरी उघडण्याच्या व्हॉल्व्हद्वारे इनलेट पाईपद्वारे पाणी भरले जाते. ड्रममध्ये शमतेपर्यंत पाणी भरल्यानंतर सेन्सरद्वारे उपकरण इनलेट पाईप बंद करते.
वॉशिंग मशीनचे भाग | Parts of Washing Machine
वॉशिंग मशीनमध्ये बरेच वेगवेगळे भाग असतात ते पुढीलप्रमाणे
- वाटर सलेक्टर
- वाटर लेबल कंट्रोल
- टाइम कंट्रोल
- टब
- लिड स्विच
- मोटर पुल्ली
- मोटर
- ट्रांसमिशन
- वाटर पंप
- स्पिन पुल्ली
- वाटर फ़िल्टर
- वाटर इनलेट वाल्वस
- ड्रेन नळी
- वाटर सप्लाई होसेस
वॉशिंग मशीनचे प्रकार
1) सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन – सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशिनला मराठीत अर्ध स्वयंचलित वॉशिंग मशीन म्हणतात, त्याच्या नावाप्रमाणेच हे अर्धे काम करणारे वॉशिंग मशीन आहे.
2)पूर्ण स्वयंचलित वॉशिंग मशिन – पूर्ण स्वयंचलित वॉशिंग मशिनमध्ये, धुण्यापासून ते सुकवण्यापर्यंतचे काम एकाच टबमध्ये केले जाते, आपल्या हातांना कपडे धुणे किंवा वाळवणे सारखे कष्ट करावे लागत नाहीत.
3)टॉप लोड वॉशिंग मशिन – मशीन टॉप लोड वॉशिंग मशीनमध्ये, कपडे धुण्यासाठी जास्त पाणी लागते कारण कपडे भिजवण्यासाठी आणि धुण्यासाठी जास्त पाणी लागते.
4)फ्रेंच लोड वॉशिंग मशीन – फ्रेंच लोड वॉशिंग मशीन कपडे स्वच्छ करण्यासाठी कमी पाणी वापरले जाते, परंतु ते जास्त तापमानाला पाणी गरम करून कपडे स्वच्छ करतात.
वरील चारही प्रकारांमध्ये पाहिलेत तर असे जानवते कि, प्रत्येक प्रकाराचे असे काही वैशिष्ठ्य आहे. आणि ते पाहुनच तुम्ही एखादि वॉशिंग मशीन खरेदी करायचा विचार करु शकता.
वॉशिंग मशिन खरेदी करताना काय खबरदारी घ्यावी
वॉशिंग मशिन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून आपण आपल्या गरजेनुसार योग्य वॉशिंग मशीन खरेदी करण्यास मदत होइल.
चांगली वॉशिंग मशिन खरेदी करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही वॉशिंग मशिनची कार्यक्षमता पाहिली पाहिजे जेणेकरून तुम्ही चांगली कार्यक्षमता असलेले वॉशिंग मशीन खरेदी करू शकता.
वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुण्यासाठी एक ड्रम असतो, तो ड्रम कोणत्या मटेरिअलचा आहे हे तपासावे, ड्रम प्लास्टिक किंवा स्टेलन स्टील मटेरियलचा असावा.
कपडे धुलाई मशिनमध्ये कपडे टाकल्यावर त्यांचा भार दिसतो, म्हणूनच वॉशिंग मशिन कमी लोड घेते की जास्त भार घेते, तुम्ही त्याचे लोडिंग पर्याय पहावे.
वॉशिंग मशीन घेण्यापूर्वी, कपडे घेण्याची क्षमता पहा कारण काही मशीन कमी भार घेतात आणि काही मशीनमध्ये जास्त कपडे घेण्याची क्षमता असते.
कपडे धुलाई मशिन विकत घेण्यापूर्वी, तुम्ही मशिनमधील तापमान नियंत्रक हीटर पाहावा, वॉशिंग मशिनमधील तापमान नियंत्रण हीटरमुळे, वॉशिंग मशिन स्वतःच तापमान नियंत्रित करते.
मित्रांनो, तुम्हांला वॉशिंग मशीनच्या माहितीचा लेख कसा वाटला. आशा आहे तुम्हांला हा लेख आवडला असेलच. जर तुम्हांला हा लेख आवडला असेल, तर कृपया आमच्या वेबसाइटला सबस्क्राइब करा. धन्यवाद!
That is really interesting, You are a very skilled blogger.
I’ve joined your feed and look forward to looking for extra of your fantastic post.
Additionally, I have shared your site in my social networks
Thanks…keep supporting me
I may need your help. I’ve been doing research on gate io recently, and I’ve tried a lot of different things. Later, I read your article, and I think your way of writing has given me some innovative ideas, thank you very much.