स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? | Competitive Exams

आजकाल बहूतेक पदवीधर तरुण-तरुणी नावलौकिक वा नोकरीच्या शाश्वतीमुळे (job security) स्पर्धा परीक्षांची तयारी करताना दिसतात. पार अगदी खेड्यापासून ते मोठ्या शहरापर्यंत स्पर्धा परीक्षांचे वारे घुमत आहेत. असं असलं तरी देश अथवा राज्यातील काही भागात “स्पर्धा परीक्षा म्हणजे काय?”, याविषयी माहिती नाही. तर पहिल्यांदा आपण “स्पर्धा परीक्षा म्हणजे काय?” ते पाहू या.

 

Competitive Exams
Competitive Exams

स्पर्धा परीक्षा म्हणजे काय?

स्पर्धा परीक्षा ज्याला आपण इंग्रजीमध्ये competitive exam म्हणतो. स्पर्धा परीक्षा घेण्याचे एक मुख्य कारण म्हणजे “नोकरभरती” होय. सरकारच्या विविध विभागांमध्ये काम करण्यासाठी मनुष्य बळाची गरज असते. आणि त्याचसाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन सरकारच्यावतीने विविध सरकारी एजन्सींकडून केले जाते. सरकारी एजन्सींमध्ये प्रामुख्याने upsc, ssc cgl, राज्यांमधील राज्य लोकसेवा आयोग (mpsc, uppsc, mppsc, इत्यादी) व इतरही काही एजन्सी आहेत. या लेखात आपण mpsc म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेविषयी जाणून घेणार आहोत.

 

 

MPSC राज्यसेवा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (maharashtra public service commission) ज्याला आपण संक्षिप्त रुपात mpsc म्हणून संबोधतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यभरातील विविध विभागांमध्ये गट-अ ते गट-क मध्ये मोडणाऱ्या पदांची भरती करतो. त्यासाठी mpsc मार्फत स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. त्यामधीलच एक परीक्षा म्हणजे “राज्यसेवा” होय. राज्यसेवेमार्फत राजपत्रित गट-अ व गट-ब ची पदे भरली जातात त्या पदांचा तपशील पुढीलप्रमाणे :

गट-अ गट-ब
उपजिल्हाधिकारी मंत्रालय विभाग अधिकारी
पोलिस उपअधीक्षक (DySP) उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग
तहसीलदार नायब तहसीलदार
विक्री कर सहाय्यक आयुक्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी
उपनिबंधक सहकारी संस्था तालुका निरीक्षक भूमी अभिलेख (TILR)
उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य अधिकारी, नगर पालिका / नगर परिषद – ब
गट विकास अधिकारी (BDO) – ब गट विकास अधिकारी (BDO) – ब

राज्यसेवा परीक्षा देण्याकरिता लागणारी पात्रता

सामान्य पात्रता :

उमेदवार हा भारताचा नागरिक व महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.

See also  डोकेदुखी म्हणजे काय, ती का होते, त्याची लक्षणे, कारणे आणि उपचार

शैक्षणीक पात्रता | Educational Qualification :

  • उमेदवार हा पदवीधर (graduate) असावा. पदवी कोणत्याही शाखेतून घेतली असेल तरी चालेल. उदाहरणार्थ., बी.ई., बी. एस. सी., बी. एड., बी कॉम, आर्टस, इत्यादी.
  •  राज्यसेवा पात्रतेसाठी mpsc ने टक्केवारीसंबंधी कोणतीही अट दिलेली नाही. उमेदवार फक्त पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10 वी 12 ला किती मार्क्स होते हेही mpsc बघत नाही.

 

वयोमर्यादा | Age Criteria :

वर्ग (Category) किमान वय कमाल वय
खुला (Open) 19 38
इतर मागास (OBC) 19 43
अनुसूचित जाती – जमाती (SC, ST, NT) 19 43
खेळाडू (Sports Person) 19 43
माजी सैनिक (Ex-Serviceman) 19 43
दिव्यांग (Handicapped) 19 45

 

एक उमेदवार mpsc राज्यसेवेची परीक्षा किती वेळा देऊ शकतो?

तुम्हांला सांगू इच्छितो कि, mpsc ने याबाबत अधिकृतपणे काही सांगितले नाही. म्हणजेच तुम्ही तुमच्या वयोमर्यादेनुसार कितिही वेळा ही परीक्षा देऊ शकता.

 

 

राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप

राज्यसेवा हि परीक्षा वर्षातून एकदा घेण्यात येते. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत.

    1. पूर्व परीक्षा (Prelims)
    2. मुख्य परीक्षा (mains)
    3. मुलाखत (Interview)

पूर्व परीक्षा (Prelims Exam)

MPSC राज्यसेवा परीक्षेतील पहिला टप्पा म्हणजे पूर्व परीक्षा होय हि एकूण 400 गुणांची असते व या टप्प्यामध्ये दोन पेपर असतात. प्रत्येक पेपर हा 200 गुणांचा असतो. सगळे प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे (multiple choice) असतात. यामध्ये negative marking system असते. म्हणजेच एका प्रश्नाचे उत्तर चुकल्यास मिळालेल्या मार्क्समधुन 1/3 मार्क्स वजा केले जातात.

 

मुख्य परीक्षा (Mains)

पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार मुख्य परीक्षेस पात्र ठरतो. राज्यसेवा मुख्य परीक्षा एकूण 800 गुणांची असते व 6 पेपरचा समावेश केलेला असतो. पहिले 2 पेपर हे प्रत्येकी 100 गुणांचे असून इतर 4 पेपर हे प्रत्येकी 400 गुणांचे असतात. सगळे प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे (multiple choice) असतात. यामध्ये negative marking system असते. म्हणजेच एका प्रश्नाचे उत्तर चुकल्यास मिळालेल्या मार्क्समधुन 1/3 मार्क्स वजा केले जातात.

See also  विंडोज 10 साठी 10 आवश्यक सॉफ्टवेअर्स 

 

मुलाखत (Interview)

मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार मुलाखतीस पात्र ठरतो. मुलाखत हि एकूण 100 गुणांची असते.

तिन्ही टप्पे पार पडल्यानंतर आयोग पदसंख्येनुसार मेरिट लिस्ट बनवतो. व त्यानुसार उमेदवारांची प्रशासकीय सेवेत विविध पदांवर निवड केली जाते.

नोंद घ्या : तुम्हांला राज्यसेवा अभ्यासक्रम, पुस्तके वा mpsc तर्फे घेण्यात येणाऱ्या इतर परीक्षांबद्दल काही शंका असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. धन्यवाद!

 

हे पण वाचा…..

3 thoughts on “स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? | Competitive Exams”

  1. सर माला mpsc ची परीक्षा द्यायची आहे .पण माला
    कुणी गायडन्स द्यायला नाही .
    पण माला तुम्ही मदत करू शकता का ?
    मी या प्रक्षेत इच्छुक आहे ,फक्त माला तुमची साथ आवी आहे

    तुमचा आदर्श विद्यार्थी ,

    मधुकर गोपाळ मेंगाळ
    मु. तळ्याचिवाडी ,सकडबाव
    ता .शहापूर ,ठाणे
    मोबाईल.९३०७६९१२८९
    ST .म ठाकूर

    Reply

Leave a Comment