इंटरनेट ऑफ थिंग्स (Internet of Things) ज्याच्यावर आज दुनिया चालली आहे असं म्हणालात तरी वावगं ठरणार नाही. इंटरनेट ऑफ थिंग्सला संक्षिप्त रुपात iot म्हणतात. इंटरनेट ऑफ थिंग्समूळे आज दुनिया जवळ आली आहे. ज्याच्यामूळे आपण माहितीची देवाण घेवाण करू शकतो. आपल्या दैनंदिन जीवनातील किंवा उद्योग क्षेत्रातील बरीचशी कामे हि IOT वर अवलंबून आहेत. तर असं हे इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय? आणि ते काम तरी कसं करत याविषयी थोडक्यात जाणून घेऊ या.
इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय?
इंटरनेट ऑफ थिंग्सचा वापर हा इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस मार्फत आपल्या दैनंदिन जीवनात केला जातो. सध्या वापरात असलेल्या स्मार्ट डिव्हायसेस मध्ये IOT चा वापर केलेला आहे.
स्मार्ट मायक्रोवेव्ह ओव्हन जे एका ठराविक तपमानात विशिष्ठ वेळेपर्यत अन्नपदार्थ शिजवते, सेल्फ ड्रायविंग कार, परिधान करण्यायोग्य असणारी फिटनेस डिव्हायसेस जे आपल्या हृदयाच्या ठोक्यांची माहिती देतात आणि बरच काही. फुटबॉल मॅचमध्ये फुटबॉलचा वेग व तो किती वेगाने फेकला गेला याची नोंद ठेवणे. तसेच IOT कडे भविष्यातील एक प्रशिक्षक म्हणूनही पाहिले जात आहे.
इंटरनेट ऑफ थिंग्स काम कसे करतात?
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये काही सेन्सर्स बसविलेले असतात आणि ती उपकरणे इंटरनेट ऑफ थिंग्स प्लॅटफॉर्मशी कनेक्ट केलेली असतात. हि उपकरणे वेगवेगळ्या डिव्हाइसेसमधिल डेटा गोळा करतात आणि त्याचे विश्लेषण करून महत्वपुर्ण माहिती आपल्याला गरज असेल तेव्हा एखाद्या अँप्लिकेशनद्वारे देतात.
असं हे शक्तिशाली IOT प्लॅटफॉर्म कोणती माहिती उपयुक्त आहे आणि कोणती नाही हे अचूकपणे सांगते. ह्या माहितीचा उपयोग नमुने शोधण्यासाठी, शिफारसी करण्यासाठी आणि संभाव्य समस्या उद्भवन्यापुर्वि त्याबद्दल सूचना देणे अशा वेगवेगळ्या कारणांसाठी केला जाऊ शकतो.
उदाहरणार्थ, जर माझा कार निर्मितीचा व्यवसाय आहे आणि मला सध्या कारमध्ये असणाऱ्या घटकांबद्दल(लेदर सीट किंवा व्हील्स) माहिती हवी असल्यास, इंटरनेट ऑफ थिंग्सचा वापर करून मला हवी असणारी माहिती मिळवू शकतो. अजून काही आपण वास्तविक उदाहरणे पाहू या, जेणेकरुन IOT आपल्या दैनंदिन जीवणात कसं परिणाम करते हे चांगल्या प्रकारे समजेल.
1)स्मार्ट होम (Smart Home)
तुम्हांला ठाऊक असेलच, आजकाल सगळं स्मार्ट होत चालले आहे, त्यामध्ये आपल्या राहत्या घराचाही समावेश आहे. आपल्या घरामधील विजेवर चालणारी सगळी उपकरणे ही आपण IOT द्वारे कंट्रोल करू शकतो. समजा, तुम्ही काही कारणास्तव बाहेर आहात आणि तुम्हाला मध्येच आठवले कि मी घरामधील बल्ब वैगरे बंद केलेत कि नाही, जर तुमच्या घरातील उपकरणे IOT शी कनेक्ट असतील तर तुम्ही ती ज्या ठिकाणी असणार त्या ठिकाणावरुन खात्री करू शकता. आणि हे IOT मुळेच शक्य होते.
2)आधुनिक शेती (Modern Farming)
आजकाल IOT चा वापर हा आधुनिक शेती पध्दतीमध्ये खूप मोठे प्रमाणावर होत आहे. असं गृहीत धरा, मी एक बागायतदार आहे आणि मला बागेमध्ये न जाता झाडांना पाणी द्यायचे असल्यास मी ते IOT चा वापर करून देऊ शकतो. IOT मुळे आपण झाडांना पाहिजे तेवढंच पानि देऊ शकतो त्यामुळे झाडांना कोणतीही हानी सुद्धा पोहोचणार नाही.
तुम्हांला हा लेख कसा वाटला ते कंमेंट बॉक्समध्ये कंमेंट करून जरुर सांगा.