सुपर कॉम्पुटर म्हणजे काय?

सुपर कॉम्पुटर ज्याची आज जगभरात चर्चा होताना दिसत आहे. जगभरातले अनेक देश सुपर कॉम्पुटर विकसित करण्यासाठी धडपड करीत आहेत. तुम्हांला प्रश्न पडला असेलच कि या सुपर कॉम्पुटरमध्ये असं आहे तरी काय ज्याच्या मागे सगळी दुनिया लागली आहे. एखाद्या देशाकडे असं डिवाइस असणे म्हणजे अभिमानाची गोष्ट असावी का? जगभरात असे डिवाइस विकसित झाले आहेत का? अशा डिवाइसचा वापर कुठे केला जातो? आणि भारत या रेसमध्ये कुठे आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या लेखात पाहू या.

 

Super Computer
Super Computer

सुपर कॉम्पुटर म्हणजे काय?

आज माणसानेअशा कितीतरी मशिन्स बनवल्या आहेत ज्यामुळे माणसाचे जीवन सुखी बनलं आहे. कॉम्पुटर ही त्यामधीलच एक क्रांतीकारक मशिन आहे. या मशीनने तर माणसाच्या जीवनात कितीतरी बदल घडवून आणले आहेत. आज असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यामध्ये कॉम्पुटरचा वापर होत नाही. शिक्षणापासुन वैद्यकिय, बँकिंग, संशोधन अशा विविध क्षेत्रात या मशीनला कोणी प्रतिस्पर्धिच नाही आहे. असं असून सुद्धा या मशीनवर पण काही मर्यादा आहेत.

आपल्या जीवनाशी निगडित अशी काही कामे आहेत ती एका साधारण कॉम्पुटरद्वारे केली जाऊ शकत नाही. तर अशी कामे करण्यासाठी सुपर कॉम्पुटरचा वापर केला जातो. सुपर कॉम्पुटर म्हणजे कॉम्पुटरचीच एक ऍडव्हान्स मशीन होय. जी सामान्य कॉम्पुटरपेक्षा कितीतरी पट वेगाने आणि अचूक काम करते. जे काम साधारण कॉम्पुटरद्वारे करण्यासाठी काही वर्षे व महिने लागतात तेच काम ही मशीन काही सेकंदामध्ये करते.

 

सुपर कॉम्पुटर कोणी व कधी बनवला?

सेमोर क्रे (Seymour Cray) या संशोधकाने सन 1960 मध्ये विकसित केला.

 

सुपर कॉम्पुटर अन्य कॉम्पुटरपेक्षा कसे वेगळे असतात?

  • सुपर कॉम्पुटरची रचना ही अन्य कॉम्पुटरपेक्षा खूप वेगळी असते.
  • अशा कॉम्पुटरमध्ये बहुतकरून लिनक्स (Linux) या ऑपरेटींग सिस्टिम (Operating System) चा वापर केला जातो. याव्यतिरिक्त Centox, Bullox, Cray Linux याही ऑपरेटींग सिस्टिमचा वापर गरजेनुसार केला जातो.
  • एखादा सुपर कॉम्पुटर किती शक्तिशाली आहे याची गणना Flops या एककाद्वारे केली जाते. Flops म्हणजे Floating Point Operating Per Second. Flops ची काही एकके खालीलप्रमाणे:
See also  तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रात झालेले बदल
Kiloflops(KFlops) 102 Flops
Megaflops(MFlops) 106 Flops
Gigaflops(GFlops) 109 Flops
Teraflops(TFlops) 1012 Flops
Petaflops(PFlops) 1015 Flops
Exaflops(EFlops) 1018 Flops

सुपर कॉम्पुटरची कार्ये(Functions of super computer)

1) हवामान अंदाज(Weather Forcasting)

2) तेल व वायू शोध(Oil and Gas Exploration)

3) ऍनिमेटेड ग्राफिक्स(Animated Graphics)

4) आण्विक ऊर्जा संशोधन(Nuclear Energy Research)

 

जगभरातील टॉप 10 सुपर कॉम्पुटर

देश कॉम्पुटरचे नाव वेग
Japan Fugaku 442 PFlops
US(अमेरिका) Summit 148.8 PFlops
US Sierra 94.6 PFlops
China Sunway Tai Hulight 93 PFlops
US Selene 27.6 PFlops
China Tianhe-2A 61.4 PFlops
Germany Juwels Booster
Italy HPC5 35.5 PFlops
US Frontera 23.5 PFlops
Saudi Arabia Dammam-7 22.4 PFlops

भारतात असणारे सुपर कॉम्पुटर

भारतही या रेसमध्ये मागे नाही, भारतातील 2 सुपर कॉम्पुटर जगभरातील टॉप 500 मध्ये येतात. त्यामध्ये परम सिद्धी 63व्या तर प्रत्यायुष cray XC40 146व्या स्थानावर आहे.

परम सिद्धी सुपर कॉम्पुटर सन 1992 मध्ये विकसित करण्यात आला.

तर प्रत्यायुष cray XC40 सुपर कॉम्पुटर सन 2018 मध्ये विकसित करण्यात आला. हा भारतातील सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्पुटर असून याची स्थापना IITM पुणे येथे करण्यात आली आहे. त्याबद्दल थोडक्यात
मेमरी : 1.5TB
वेग : 42.56 Tflops

तुम्हांला हा लेख कसा वाटला ते कंमेंट बॉक्समध्ये कंमेंट करून जरुर सांगा.

हे पण वाचा…..

1 thought on “सुपर कॉम्पुटर म्हणजे काय?”

  1. My brother recommended I might like this web site. He was once totally right. This post truly made my day. You can not imagine simply how a lot time I had spent for this information! Thank you!

    Reply

Leave a Comment