झेरॉक्स मशीन माहिती मराठीमध्ये | Xerox Machine

झेरॉक्स (Xerox) ह्या शब्दाचा शब्दप्रयोग आजवर केला नसेल, असा क्वचितच कोणी भेटेल. झेरॉक्स मशिन जिचा वापर आपल्यापैकी अनेक जणांनी कधी ना कधी केला असेलच. गावा-शहरापासुन सगळीकडे एखाद्या छोट्याशा गाळ्यात किंवा मोठ्या स्टेशनरीच्या दुकानात तुम्हांला कुठे ना कुठे झेरॉक्सवाला सापडेलच.

 

झेरॉक्स हे एका कंपनीचं नाव आहे ज्या कंपनीने या मशीनला विकसित केलं. पण, या मशीनचं खरं नाव आहे फोटोकॉपी मशीन (Photocopy Machine), म्हणजे एखाद्या फोटोची हूबहू दुसरी कॉपी बनविणे होय.

 

बहुधा या मशिनचा वापर ज्या ठिकाणी पेपर वर्क असतो तिथे होतोच, उदाहरणार्थ शिक्षण क्षेत्रात, उदयोग आदींमध्ये होतो. अजून एक साधं उदाहरण घ्यायच म्हटलं तर, लग्नाची निमंत्रण पत्रिका, प्रश्नपत्रिका (Question Paper) यांची एक कॉपी बनवली जाते. बाकी आपल्या गरजेनुसार त्याच्या झेरॉक्स काढल्या जातात.

Xerox Machine

 

झेरॉक्स मशीन हयात नव्हती तेव्हा?

झेरॉक्स माशिनचा शोध लागण्यापूर्वीही आपण एका कागदाच्या अनेक प्रत कार्बन पेपरद्वारे घेऊ शकत होतो. पण, कार्बन पेपरचं काम हे झेरॉक्स मशीनपेक्षा फार वेगळं आहे.

 

एखाद्या पेपरच्या आपल्याला प्रत (copy) हव्या असल्यास मूळ प्रत (Original copy) तयार करतानाच त्याखाली कार्बन पेपर ठेवला जायचा व त्याखाली कोरा कागद ठेवून मूळ प्रतवर लिहिलेला मजकूर दुसऱ्या कागदावर छापला जायचा.

 

आजही कार्बन पेपरचा उपयोग काही क्षेत्रात विशिष्ठ हेतूसाठी व दुर्गम भागात होतो, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे. काही देशांमध्ये तर कार्बन पेपर इतिहासजमा झाला आहे. तर या लेखात आपण सध्या वापरात असलेल्या झेरॉक्स मशीनबद्दल थोडक्यात माहिती घेऊ या.

 

झेरॉक्स मशीनचा शोध कोणी व कधी लावला?

झेरॉक्स मशीनचा शोध चेस्टर फ्लोयड कार्लसन(Chester Floyd Carlson) या अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञाने सन 1938 मध्ये लावला.

 

झेरॉक्स मशीन कार्य कशी करते?

आपल्याला एखाद्या पेपरची फोटोकॉपी करावयाची असल्यास आपण झेरॉक्स सेंटरवर जातो. व झेरॉक्स सेंटरवाल्याला हव्या त्या पेपरच्या आपल्या गरजेनुसार प्रत काढन्यास सांगतो.

See also  टॉप 15 प्रोग्रामिंग भाषा | Programming Languages

 

तुम्ही जर बारकाईने पाहिले तर तुमच्या लक्षात आलं असेल जेव्हा झेरॉक्सवाला आपण दिलेला पेपर झेरॉक्स मशीनमध्ये टाकतो तेव्हा त्या पेपर खालून एक तेजस्वी प्रकाश (Light) जातो.

 

हाच तेजस्वी प्रकाश आपल्या पेपर ला स्कॅन करतो आणि त्याच एक प्रतिबिंब तयार करतो. हे प्रतिबिंब विद्युत स्वरूपात असून ते फोटोकंडक्टरवर तयार होते.

 

फोटोकॉपीयरमधिल फोटोकंडक्टर हा एक फिरणारा कन्व्हेअर बेल्ट असतो. तयार झालेले प्रतिबिंब कन्व्हेअर बेल्ट फिरत असताना स्वतःभोवती घेतो.

 

त्याचप्रमाणे मशीनमध्ये एक शाही ड्रम असतो त्यामध्ये शाही हि पावडर किंवा द्रव स्वरूपामध्ये ठेवलेली असते. शाही ड्रम कन्व्हेअर बेल्टला उपलब्ध शाहीद्वारे लेपन (Coating) करतो.

 

शाही ही विद्युत भारीत (Electrically charge) असते म्हणून ती विद्युत प्रतिबिंबाला चिटकते. आणि कन्व्हेअर बेल्टवर मूळ प्रतची आणखी एक तशीच प्रतिमा तयार होते.

 

जेव्हा कन्व्हेअर बेल्टचा मशीनमध्ये ठेवलेल्या साध्या कागदाशी संपर्क येतो तेव्हा तयार झालेले प्रतिबिंब विद्युत भारेद्वारे साध्या कागदावर हस्तांतरित होते.

 

हस्तांतरित झालेला कागद उष्ण दाब असलेल्या दोन रोलर्समधून जातो आणि ते प्रतिबिंब कायमस्वरूपी पेपरवर प्रिंट होते. अंतिम प्रत कॉपीएर मधून बाहेर येते आणि झेरॉक्सवाला ती प्रत आपल्याला देतो. अशाप्रकारे एक झेरॉक्स मशीन काम करते.

 

झेरॉक्स मशीनबद्दल तुम्हांला काही शंका असल्यास आणि तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवा. धन्यवाद!!

 

हे पण वाचा…..

2 thoughts on “झेरॉक्स मशीन माहिती मराठीमध्ये | Xerox Machine”

  1. Very nice post. I just stumbled upon your blog and wanted to say that I’ve really enjoyed browsing your blog posts. In any case I’ll be subscribing to your feed and I hope you write again soon!

    Reply
  2. Hi, just required you to know I he added your site to my Google bookmarks due to your layout. But seriously, I believe your internet site has 1 in the freshest theme I??ve came across. It extremely helps make reading your blog significantly easier.

    Reply

Leave a Comment