कॉम्पुटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर

आपणांस माहित आहे कि, संगणकाचे आपल्या जीवनातील महत्व नगन्य आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास संगणक (कॉम्पुटर) आपल्या जीवनातील एक अविभाज्य भागच बनला आहे. कलियुगातील माणसाची खूपशी कामे हि कॉम्पुटरद्वारे होतात.

 

उदा., माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे पूर्णपणे कॉम्पुटरवर अवलंबुन आहे. तुम्ही कोणत्याही एका बँक किंवा IT (Information Technology) कंपनीत गेल्यास तेथील कर्मचारी (Staff) आपले काम कॉम्पुटरद्वारे करताना दिसतील. फक्त माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कॉम्पुटरचा उपयोग होतो असं नाही तर अन्य क्षेत्रात देखील कॉम्पुटरचे महत्व नगन्य आहे. तर असं हे कॉम्पुटर बनवण्याकरीता कोणत्याकोणत्या हार्डवेअर वा सॉफ्टवेअरचा वापर केला जातो ते या लेखामध्ये पाहू या.

 

कॉम्पुटर (computer) बनवण्याकरीता मुख्यत्वेकरुन दोन गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे हार्डवेअर आणि दुसरं म्हणजे सॉफ्टवेअर होय. तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर काय असते ते पाहू या.

Computer Hardware & Software
Computer Hardware & Software

 

कॉम्पुटर हार्डवेअर म्हणजे काय?

आपण पाहू किंवा स्पर्श करू शकू अशा कॉम्पुटरच्या भागांना ‘हार्डवेअर’ असे म्हणतात. जे एकमेकांची वायरद्वारे जोडलेले असतात. उदाहरणार्थ., मॉनिटर, प्रिंटर, कॉम्पुटर मेमरी, कीबोर्ड, माऊस, कॅबिनेट असे विविध डिव्हायसेस मिळून एक कॉम्पुटर बनत असतो.

 

कॉम्पुटर हार्डवेअरचे प्रकार

1) सिस्टिम युनिट (System Unit)

हा एक प्रकारचा कंटेनर असतो, ज्याच्यामध्ये कॉम्पुटरची इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जोडलेली असतात. याचा आकार एखाद्या बॉक्ससारखा असतो. आपण त्याला सामान्य भाषेत CPU (central processing unit) म्हणतो.

 

2) इनपुट डिव्हायसेस (Input Devices)

इनपुट डिव्हायसेस युजर ने दिलेल्या सूचनांना कॉम्पुटरपर्यंत पोहोचवतात. त्यानंतरच कॉम्पुटर आपलं कार्य करत असतो.

काही इनपुट डिव्हायसेस

  • कीबोर्ड (keyboard)
  • स्कॅनर (scanner)
  • माऊस(mouse)
  • टचस्क्रीन (touchscreen)

 

3)आउटपुट डिव्हाइसेस (Output Devices)

आउटपुट डिव्हायसेस इनपुट डिव्हायसद्वारे दिलेल्या सूचनांना माणुस (human) समजू शकेल अशा रूपात प्रदर्शित करतात. म्हणजे, आपण कॉम्पुटरवर जे काम करत आहोत त्याचा परिणाम ज्या उपकरणांच्या माध्यमातुन मिळतो, त्यांना “आउटपुट डिव्हाइसेस” म्हणतात.

See also  सुपर कॉम्पुटर म्हणजे काय?

काही आउटपुट डिव्हाइसेस

  • मॉनिटर (Monitor)
  • प्रिंटर (Printer)
  • स्पीकर (Speaker)

 

4)अंतर्गत भाग

कॉम्पुटरचे असे भाग जे system unit च्या आतमध्ये असतात त्यांना ‘कॉम्पुटरचे अंतर्गत भाग’ म्हणतात. हि उपकरणे नाजूक असून आपण त्यांना बाहेरून पाहू शकत नाही. म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी कॅबिनेटची गरज भासते.
काही अंतर्गत उपकरणे

  • मदरबोर्ड (Motherboard)
  • पॉवर सप्लाय (SMPS)
  • रॅम (Ram)
  • हार्ड डिस्क ड्राईव्ह (Hard Disk Drive)
  • DVD writer

 

 

कॉम्पुटर सॉफ्टवेयर म्हणजे काय?

हार्डवेअरद्वारे कॉम्पुटर चालविण्यासाठी काही सूचना व प्रोग्रामची आवश्यकता असते त्यालाच आपण ‘सॉफ्टवेअर‘ म्हणतो. सॉफ्टवेअर हा एक सूचनांचा सेट असतो, जो हार्डवेअरला कमांड देण्याकरिता उपयोगी ठरतो. त्यामुळेच आपल्याला पाहिजे तो आउटपुट मिळतो. थोडक्यात, सॉफ्टवेअर वापरकर्ता (user) आणि हार्डवेअर यांमध्ये मध्यस्थीच (interface) काम करतो.

कॉम्पुटर सॉफ्टवेयरचे प्रकार

1)सिस्टिम सॉफ्टवेअर (System Software)

सिस्टिम सॉफ्टवेअर जो हार्डवेअरला सूचना देण्याचे काम करतो. त्याचे प्रकार पुढीलप्रमाणे:

 

1.1)ऑपरेटींग सिस्टिम (operating system)

कॉम्पुटर चालविण्यासाठी ज्या कमांड दिल्या जातात त्यालाच आपण ‘ऑपरेटींग सिस्टिम’ म्हणतो. याला संक्षिप्त मध्ये OS असं म्हणतो. OS संगणक आणि वापरकर्ता (user) यांमध्ये मध्यस्थीचे (interface) काम करतो. OS संगणकाला सूचना देण्याचे काम करतो.

काही प्रचलित OS

  • विंडोज (windows)
  • मॅक (mac)
  • लिनक्स (linux)
  • उबंटू (ubuntu)

 

1.2)युटिलिटी प्रोग्राम (Utility programs)

Utilities ना सर्विस प्रोग्रामच्या नावाने ओळखले जाते. हे प्रोग्राम्स संगणक संसाधनांचे व्यवस्थापन आणि संरक्षण करण्याचे कार्य करतात. ते थेट हार्डवेयरशी कनेक्ट केलेले नसतात. डिस्क डीफ्रॅगमेंटर (disk defragmenter), अँटीव्हायरस (antivirus) आदी utility प्रोग्राम आहेत.

 

1.3)डिव्हाइस ड्रायव्हर (device driver)

ड्राइवर एक विशेष प्रोग्राम असतो जो इनपुट आणि आउटपुट कॉम्पुटरशी जोडतो. जसे ऑडिओ ड्राइवर (audio driver), ग्राफिक ड्राइवर (graphic driver), मदरबोर्ड ड्राइवर (motherboard driver) आदी.

 

 

2)अँप्लिकेशन सॉफ्टवेअर (aaplication software)

अँप्लिकेशन सॉफ्टवेअरना युजर एन्ड (user end) सॉफ्टवेअर असे म्हटले जाते. कारण युजर आपल्या गरजेनुसार कॉम्पुटरमध्ये इंस्टाल करत असतो. याला अँप्स (apps) देखील म्हटले जाते.

See also  डिजिटल कॅमेरा माहिती मराठीमध्ये

अँप्लिकेशन सॉफ्टवेअरचे प्रकार

1)बेसिक अँप्लिकेशन्स

बेसिक अँप्लिकेशन्स कोणत्याही कॉम्पुटरमध्ये तुम्हांला इंस्टाल केलेले दिसतील. या अँप्लिकेशन्स वापर आपल्या दैनंदिन जीवनातील किंवा कार्यकालयातील कामे करण्यासाठी केला जातो. आणि हे अँप्लिकेशन्स एखाद्या कॉम्पुटर युजरला हाताळता येणे गरजेचे आहे.

काही बेसिक अँप्लिकेशन्स

1.1) मायक्रोसॉफ्ट वर्ड (word), एक्सेल (excel), पॉवर पॉईंट(power point), आऊटलुक, आदी.
1.2)इंटरनेट ब्राऊजर : फायरफॉक्स (firefox), मोझिला (mozilla), सफारी (safari), क्रोम (chrome) आदी.

 

2)विशेष सॉफ्टवेअर (Specialized Software)

विशेष सॉफ्टवेअर एखाद्या खास उद्देशांसाठी बनवले जातात. त्याची उदाहरणे पुढीलप्रमाणे : बिलिंग सॉफ्टवेअर, पेरोल मॅनेजमेन्ट सॉफ्टवेअर, अकाउंटिंग सॉफ्टवेअर आदी.

तुम्हांला हा लेख कसा वाटला ते कंमेंट बॉक्समध्ये कंमेंट करून जरुर सांगा. धन्यवाद!

 

हे पण वाचा…..

1 thought on “कॉम्पुटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर”

Leave a Comment