www काय आहे? | What is www?

नमस्कार मित्रांनो, तुम्हांला माहित आहे का WWW काय आहे ? आज जगभरात अनेकजन इंटरनेटचा वापर करतात, पण त्यापैकी बऱ्याच जणांना www काय आहे हे माहिती नाही. इंटरनेटवर तुम्ही एखाद्या विषयावर सर्च केल्यास त्या विषयासंदर्भात असणाऱ्या सगळ्या sites open होतात. जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केले असल्यास तुमच्या लक्षात आलं असेलच कि open झालेल्या sites च्या अगोदर WWW असते.

उदाहरणार्थ, www.marathig.com, www.facebook.com आदी. तर या लेखामध्ये आपण डब्लूडब्लूडब्लू विषयी चर्चा करणार आहोत.

World Wide Web

WWW काय आहे?

वर्ल्ड वाइड वेबला (World Wide Web) संक्षिप्तमध्ये www म्हटले जाते. यालाच वेब (Web) या नावाने देखील ओळखले जाते. इंटरनेट वापरकर्त्यांपैकी अनेकजन www ला इंटरनेट समजतात. पण, WWW ही एक इंटरनेटची सेवा (Service) असून इंटरनेटवर तिचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.

 

 

WWW चा शोध कोणी व कधी लावला?

Tim Berners-Lee ला WWW चा निर्माता म्हटले जाते. Berners-Lee हे W3C चे डायरेक्टर होते. यांनीच हायपरटेक्स्ट, वेबपेज लिंकआणि वेबसाईटद्वारे बोलण्याचे तंत्रज्ञान विकसित केले.

सन 1989 मध्ये Berners-Lee यांनी WWW वर काम करण्यास सुरुवात केली आणि सन 1991 मध्ये साऱ्या जगाला ते वापरावयास मिळाले. तेव्हापासून आजपर्यंत याचा वापर कधीच थांबला नाही.

 

 

WWW चे प्रमुख काम

  • जगभरातील Web Servers आणि Clients ना जोडणे होय.
  • Web Servers वर असणाऱ्या online content ला वापरकर्त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांच्यापर्यंत पोहोचविणे. Online content मध्ये html दस्तावेज़, इमेजेस, विडिओ आदींचा समावेश असू शकतो.

जगभरात असणाऱ्या सगळ्या websites आणि web pages, ज्या आपण web browser वर पाहू शकतो त्या सगळ्या web शी जोडलेल्या असतात. त्यांना ऍक्सेस करण्यासाठी HTTP चा (Hypertext Transfer Protocol) वापर केला जातो.

वर्ल्ड वाइड वेबद्वारे एखाद्या वेबसाईटला ऍक्सेस करण्यासाठी विविध टेक्नोलॉजीजचा वापर केला जातो त्या खालीलप्रमाणे:

See also  कॅप्चा कोड काय आहे? | What is Captcha Code?

1) HTML(Hypertext Markup Language)

ही एक प्रकारची भाषा असून तिच्या मदतीने वेबपेज बनवले जाते. एक वेबसाईट बनवण्याकरीता कित्येक वेबपेजेसचा वापर केला जातो.

 

2) Server

सर्वर एक प्रकारचा कॉम्पुटर असतो ज्यामध्ये विविध वेबसाईट्सचा content संग्रहित करून ठेवलेला असतो. हाच सर्वर WWW शी जोडलेला असतो त्यामुळेच आपण एखाद्या वेबसाईटवरील content इंटरनेटच्या मदतीने जगभरातील कोणत्याही ठिकाणाहुन access करू शकतो.

 

3)HTTP (Hypertext Transfer Protocol)

वेबमध्ये एखादी माहिती सर्वरवरून आपल्या कॉम्पुटरपर्यंत पोहोचते त्यासाठी HTTP चा वापर केला जातो.

 

4)URL (Uniform Resource Locator)

हा एक प्रकारचा ऍड्रेस आहे तो एखादा content कोणत्या location वर उपलब्ध आहे हे सांगतो.

 

5)Web Browser

हा एक सॉफ्टवेअर आहे, ज्यामध्ये एक ऍड्रेस बार असतो, ज्यावर url एंटर करून एखाद्या वेबसाईट पर्यंत आपण पोहोचू शकतो.

 

हे पण वाचा…..

2 thoughts on “www काय आहे? | What is www?”

Leave a Comment