माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय? आणि त्यामध्ये असणाऱ्या करिअर संधी

नमस्कार मित्रांनो, तुम्हांला माहित आहेच देशभरात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. सर्वत्र ‘लॉकडाउन’ संबधी बातम्या ऐकायला मिळत आहेत. लॉकडाउनमुळे कित्येक लोकांचे जॉब्स गेले आहेत, काहीजण अर्ध पगारी काम करत आहेत. पण, अशा परिस्थितीतही माहिती तंत्रज्ञान (Information Technology) क्षेत्रावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. हे क्षेत्र त्याच जोमाने आपली प्रगती करत आहे. म्हणून आजकाल अनेकजन या क्षेत्रासंबधी शिक्षण वा कोर्सेस करण्यासाठी उत्सुक आहे. तर या लेखात आपण याच क्षेत्राविषयी माहिती घेणार आहोत.

Information Technology
Information Technology

माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय?

माहिती तंत्रज्ञान (Information Technology) ज्याला संक्षिप्त रुपात आपण आयटी (IT) म्हणतो. याद्वारे आपण जगभरात कोठेही माहितीची देवाण-घेवाण करू शकतो. यामध्ये काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जसे कि कॉम्पुटर, मोबाईल इत्यादी एकमेकांशी नेटवर्किंगच्या मदतीने जोडून माहितीची देवाण-घेवाण केली जाते.

आज IT क्षेत्राने एवढी प्रगती केली आहे कि, त्यामुळे करोडोंची उलाढाल होत आहे. कितीतरी उद्योगधंदे हे IT वर अवलंबून आहेत.

 

 

IT चा वापर कोठे केला जातो?

21 व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच IT क्षेत्राकडे व्यवसायिक दृष्टीकोनातुन पाहिलं जात आहे. आज असे कितीतरी उद्योगधंदे व अन्य क्षेत्र आहेत त्यामध्ये IT चा बोलबाला आहे. उदाहरणार्थ : शिक्षण, आरोग्य, वित्तविभाग, बँक इत्यादी. पार अगदी सुरक्षा व्यवस्थापन ते कृत्रिम बुद्धीमत्तेपर्यंत IT क्षेत्राने मजल मारली आहे. शिक्षण क्षेत्राचा विचार केला तर, ऑनलाईन शिक्षण, परीक्षा इत्यादी IT मूळेच शक्य आहे. लॉकडाउनमुळे ऑनलाईन शिक्षणाचा ओढा वाढला आहे. देश वा जगातील अनेक खाजगी अथवा सरकारी शाळा महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षणाना प्राधान्य दिले आहे.

 

 

माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील करिअर संधी

IT हे असं क्षेत्र आहे कि, ज्यावर ऊन, वारा, पाऊस अशा कोणत्याही नैसर्गीक बदलांचा वा आपत्तींचा परिणाम होत नाही. त्यामुळेच या क्षेत्राकडे एक सुरक्षित करिअर option म्हणून पाहिले जाते. आज जगभरातील हजारो-लाखो लोक या क्षेत्राशी जोडलेले आहेत. कोरोनाकाळात कितीतरी व्यवसाय उद्योगधंदे बंद पडले आहेत. पण, IT क्षेत्र या काळातसुद्धा थांबले नाही. या क्षेत्रातील लोक आज ‘लॉकडाउनमुळे’ घराबाहेर जाऊ शकत नाही त्यामुळे बहुतेकजण घरातूनच काम करत आहेत. या क्षेत्रात ‘work from home’ हा एक उत्तम पर्याय आहे कि, office मध्ये शारिरिकरित्या न जाता सगळी कामं होतात. त्यामुळेच तरुण पिढी या क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवत आहे. तर या क्षेत्रात कोणत्या करिअरच्या वाटा आहेत ते थोडक्यात पाहू या.

See also  विंडोज 10 साठी 10 आवश्यक सॉफ्टवेअर्स 

IT क्षेत्रात कोणत्या पदावर (profile) तुम्ही कामं करू शकता?

मुखत्वेकरुन या क्षेत्रात दोन प्रकारचे जॉब असतात, त्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा समावेश होतो. तर या क्षेत्रातील काही पदांचा तपशील खालीलप्रमाणे

 • Support specialist
 • Web developer
 • Quality assurance tester
 • Computer programmer
 • IT technician
 • Database administrator
 • Computer scientist
 • Data scientist
 • Technical Consultant
 • Software Engineer
 • IT director
 • User experience designer
 • IT security scientist
 • Network engineer
 • System analysis
 • System administrator

वरील पदांवर काम करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता कोणती असावी

वरीलपैकी कोणत्याची पदावर तुमची काम करण्याची इच्छा असल्यास बारावी पास झाल्यानंतर काही कोर्सेस असतात ते पूर्ण झाल्यावर संबंधित पदांवर काम करू शकता. काही कोर्सेसविषयी माहिती पुढीलप्रमाणे

1.Diploma In IT

कोर्स दर्जा पदवी
कालावधी 6-12 महिने
पात्रता 10 + 2 मान्यताप्राप्त विद्यापीठातून
कोर्स फी रु. 10,000 – 50,000
कोर्स पूर्ण झाल्यावर कोणत्या पदांवर काम करू शकता Software Developer, Designer, Technical Consultant, Software Engineer, Database administrator, Computer Programmer

2. BE (Bachelor of Engineering) In Information Technology

कोर्स दर्जा पदवी
कालावधी 4 वर्षे
पात्रता 10 + 2 (किमान 55% आवश्यक)
कोर्स फी रु. 55,000 – 4,25,000
कोर्स पूर्ण झाल्यावर कोणत्या पदांवर काम करू शकता Database Administrator, IT System Manager, System administrator, Technical Trainer, Software developer

3. BTech (Bachelor of Technology)

कोर्स दर्जा पदवी
कालावधी 4 वर्षे
पात्रता 10 + 2 (किमान 50% आवश्यक असून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे प्रमुख विषय असावेत)
कोर्स फी रु. 30,000 – 8,00,000
कोर्स पूर्ण झाल्यावर कोणत्या पदांवर काम करू शकता IT Analyst, Software Developer, System Engineer, Programmer, Web Developer

4. BCA (Bachelors of Computer Application)

कोर्स दर्जा पदवी
कालावधी 3 वर्षे
पात्रता 10 + 2 (किमान 50% आवश्यक)
कोर्स फी रु. 30,000 – 2,85,000
कोर्स पूर्ण झाल्यावर कोणत्या पदांवर काम करू शकता Computer Programmer, Software Developer, Computer Systems Analyst, Computer Support Specialist, Service Support Specialist, etc.
See also  संगणक व त्याचे भाग | Computer & Its Parts

IT क्षेत्रातील हार्डवेअरशी संबंधित असणारे काही कोर्सेस 10 वी पास झाल्यानंतर देखील करता येतात. कोर्सप्रमाणे त्याचा कालावधी वा शुल्क निर्धारित केलेले असते.

तुम्हांला हा लेख कसा वाटला ते कंमेंट बॉक्समध्ये कंमेंट करून जरुर सांगा.

 

हे पण वाचा…..

Leave a Comment