आपण राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस का साजरा करतो ?

नमस्कार मित्रांनो, आपण दरवर्षी 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा करतो. भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या कामगिरीची एक आठवण म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. याच दिवशी म्हणजेच 11 मे 1998 रोजी भारतीय सैन्याने ऑपेरेशन शक्ती (Operation Shakti) अंतर्गत विविध चाचण्यांचे यशस्वीरित्या परीक्षण केले होते. त्यामध्ये राजस्थानमधील पोखरण (Pokhran) येथे केलेल्या तीन अणुचाचण्या होत. यामधील दोन आण्विक चाचण्यांचे नेतृत्व दिवंगत अध्यक्ष डॉ. एपीजे अब्दुल कलाम (Dr. A. P. J. Abdul Kalam) यांनी केले होते.

 

National Technology Day
National Technology Day

भारतात पहिला “राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस” कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला होता ?

पहिला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा करण्यात आला हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 22 वर्षे मागे जावे लागेल. 11 मे 1998 या दिवशी पोखरणची चाचणी झाली त्याच्या दुसऱ्याच वर्षी आपण हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. म्हणजेच, 11 मे 1999 साली आपण पहिला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस (National Technology Day ) साजरा केला होता. तेव्हापासून आजपर्यंत आपण हा दिवस साजरा करत आहोत.

 

1 मे 1998 या दिवशी झालेल्या आण्विक चाचण्यांमुळे या दिवसाला एक वेगळंच महत्त्व प्राप्त होते. “ऑपरेशन शक्ती” यशस्वी होण्यासाठी तत्कालीन एरोस्पेस वैज्ञानिक आणि भारताचे माजी राष्ट्रपती एपिजे अब्दुल कलाम यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच, संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO), भाभा अनु संशोधन केंद्र (BARC), अनु खनिज संचालनालय अन्वेषण व संशोधन (AMDER) यांच्या मदतीने भारतीय सैन्याने हे अभियान यशस्वी करून दाखविले.

 

पोखरण चाचणी यशस्वी झाल्यानंतर जगभरातुन भारताचे कौतुक झाले. यातुन प्रेरणा घेऊन आपल्या देशाने तंत्रज्ञान क्षेत्रात बरीच प्रगती केली. याचंच एक उदाहरण म्हणजे भारत थर्मोन्यूक्लियर शस्त्रे आणि फिशन बॉम्ब (fission bomb) बनवण्यात सक्षम झाला.

 

तसेच, याच दिवशी भारताने स्वदेशी बनावटीच्या हंस – 1 या विमानाचे यशस्वी उड्डाण केले होते. त्याचबरोबर DRDO (Defence Research and Development Organisation) ने त्रिशूल या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी बैंगलोर येथे केली होती. या क्षेपणास्त्राचा समावेश नंतर भारतीय हवाई दल व सैन्यात करण्यात आला.

See also  इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय?

 

या दिवशी काय केलं जातं ?

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनी तंत्रज्ञान क्षेत्रात विविध स्तरावर आग्रणीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. त्यासाठी दिल्लीत मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो. कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते. व त्यांच्या हस्ते अशा व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

2021 या वर्षासाठी असणारी थिम : शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान

तुम्हांला हा लेख कसा वाटला ते कंमेंट बॉक्समध्ये कंमेंट करून जरुर सांगा.

 

हे पण वाचा…..

Leave a Comment