वेब होस्टिंग म्हणजे काय? | Web Hosting

आज तंत्रज्ञानाच्या युगात सगळं काही ऑनलाईन (online) झालेले दिसते. शिक्षण म्हणू नका, ट्रेनिंग, घरबसल्या काम (work from home) आदी कितीतरी क्षेत्र आज ऑनलाईन झाले आहेत. आज कोणतेही प्रवास तिकीट बुक (ticket book) करायचं झाल्यास ते आपण ऑनलाइन बुक करू शकतो. पण, हे सगळं ऑनलाइन पोस्ट करण्यासाठी सर्व्हर म्हणजेच वेब होस्टिंग मोलाची भूमिका बजावते. तर ही वेब होस्टिंग म्हणजे काय? वेब होस्टिंगची गरज का भासते? अशा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात घेणार आहोत.

 

Web Hosting
Web Hosting

 

वेब होस्टिंग म्हणजे काय? ( What is Web Hosting? )

वेब होस्टिंग ही एक ऑनलाइन सेवा आहे जी आपल्याला आपल्या वेबसाइट फाइल्स इंटरनेटवर प्रकाशित करण्याची परवानगी देते. आपण वेब होस्टिंगद्वारे कोणतीही माहिती ऑनलाईन पोस्ट करू शकतो. उदा. लेख (articles), विडिओ (video), ऑडिओ (audio), pdf, images, आदी.

 

वेबसाईट होस्ट करण्यासाठी वेब होस्टिंगचीच का गरज असते?

साध्या भाषेत सांगायचं झाल्यास वेब होस्टिंग हि अशी सर्विस आहे जी आपली वेबसाईट 24/7 ऑनलाईन ठेवते. म्हणजेच वेब होस्टिंग कंपनी सर्व्हर 24 तास चालू असतो. म्हणून आपल्या होस्ट केलेल्या वेबसाईटवरील डेटाचा ऍक्सेस इंटरनेटद्वारे कोणीही कधीही घेऊ शकतो.

 

वेब होस्टिंगचे प्रकार ( Types of Web Hosting )

  • Website Builders
  • Shared Hosting
  • Dedicated Hosting
  • Collected Hosting

Website Builders

वेबसाइट बिल्डर (website builders) ही एक होस्टिंग सेवा आहे जी ग्राहकांना वेबसाइट्स होस्ट करण्यासाठी परवानगी देते. वेबसाइट बिल्डर सेवा सामान्यत: आपल्याला आपली वेबसाइट तयार करण्यासाठी ऑनलाइन ब्राउझर-आधारित इंटरफेस प्रदान करते आणि कोणत्याही अतिरिक्त सेटअपशिवाय आपल्यासाठी वेबसाइट होस्ट करण्यास देखील मदत करते.

Shared Hosting

शेअर्ड होस्टिंगमध्ये ग्राहकांना अथवा वेबसाइट मालकांना होस्टिंग कंपनीद्वारे एक सर्व्हर दिला केला जातो. यामध्ये भौतिक सर्व्हर आणि सॉफ्टवेअर अँप्लिकेशन्स समाविष्ट असतात. शेअर्ड होस्टिंग सेवा ग्राहकांना परवडणारी असते कारण सर्व्हर ऑपरेट करण्यासाठीची लागणारी किंमत ग्राहक आणि होस्टिंग देणाऱ्या मालकांमध्ये विभागली जाते. म्हणून बहुतेक वेबसाईटधारक शेअर्ड होस्टिंगला पसंती देतात.

See also  डिजिटल कॅमेरा माहिती मराठीमध्ये

Dedicated Hosting

डेडिकेटेड होस्टिंगमध्ये ग्राहक स्वतः एका सर्व्हरचा मालक असतो. ज्याप्रमाणे ग्राहकाने प्लान खरेदी केला आहे त्याप्रमाणे त्याला त्याची मालकी भेटते. संपूर्ण सर्व्हरची मालकी असल्यामुळे इतर ग्राहकांबरोबर त्यातील कोणतीही सेवा शेअर्ड केली जात नाही, त्यामुळे सर्व्हरची मालकी असणाऱ्या ग्राहकाला वेगवान सेवांचा लाभ मिळतो. तथापि, याचा अर्थ असा आहे की सर्व्हरच्या ऑपरेशनसाठी लागणारा सर्व खर्च हा एका ग्राहकावर पडतो. संसाधने व सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहिल्यास ग्राहक डेडिकेटेड होस्टिंगला पसंती देतात.

Collected Hosting

या प्रकारच्या होस्टिंगमध्ये आपण आपला स्वतःचा सर्व्हर खरेदी करू शकतो आणि तो वेब होस्टिंगसारख्या सुविधांसाठी वापरला जाऊ शकतो. ग्राहकाकडे सर्व्हरची मालकी असल्यामुळे ग्राहक स्वत: सर्व्हरवर होणाऱ्या घडामोडींसाठी जबाबदार असतो. या प्रकारच्या होस्टिंग सेवेचा फायदा म्हणजे आपल्याकडे वेब सर्व्हरचे पूर्ण नियंत्रण असते. आपल्याला आवश्यक असलेली कोणतीही स्क्रिप्ट किंवा अँप्लिकेशन्स सर्व्हरवर उपलोड करू शकता.

 

वेब होस्टिंगची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

ईमेल खाती ( Email Accounts )

आधी सांगितल्याप्रमाणे, बर्‍याच होस्टिंग प्रदात्यांकडे वापरकर्त्यांचे स्वतःचे डोमेन नाव असणे आवश्यक असते. डोमेन नाव (उदा. www.website.com) आणि आपल्या होस्टिंग कंपनीद्वारे प्रदान केलेल्या ईमेल खाते वैशिष्ट्यांसह आपण डोमेन ईमेल खाती तयार करू शकता (उदा. [email protected])

 

एफटीपी ऍक्सेस ( FTP Access )

फाईल ट्रान्फर प्रोटोकॉल (file tranfer protocol) ज्याला संक्षिप्तमध्ये FTP संबोधतो. एफटीपीचा वापर करून आपण आपल्या संगणकावरून वेब सर्व्हरवर फाइल्स अपलोड करू शकतो. आपण आपल्या स्वत: च्या एचटीएमएल (HTML) फायली वापरुन आपली वेबसाइट तयार केल्यास आपण आपल्या संगणकावरील फायली एफटीपीद्वारे वेब सर्व्हरवर हस्तांतरित करू शकतो, ज्यामुळे आपल्या वेबसाइटवर इंटरनेटद्वारे प्रवेश केला जाऊ शकेल.

 

वर्डप्रेस सपोर्ट ( WordPress Support )

वर्डप्रेस एक ऑनलाइन वेबसाइट तयार करण्याचे साधन आहे. ही एक शक्तिशाली ब्लॉगिंग आणि वेबसाइट सामग्री व्यवस्थापन प्रणाली आहे, जी वेबसाइट तयार करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी अवलंबिली जाते. WordPress वापर करून वेबसाईट बनवण्याकरीता आपल्याला advance coding ची आवश्यकता नसते, बेसिक HTML आणि CSS tags व properties माहित असणे गरजेचे आहे. इंटरनेटवर असणाऱ्या वेबसाईट्सपैकी जवळपास 60 – 70% वेबसाइट्स वर्डप्रेसवर बनवल्या गेल्या आहेत.

See also  इंटरनेटच्या पिढ्या | Generations of Internet

 

हे पण वाचा…..

1 thought on “वेब होस्टिंग म्हणजे काय? | Web Hosting”

Leave a Comment