डिजिटल कॅमेरा माहिती मराठीमध्ये

Photography तुमच्यापैकी बऱ्याचजणांचा आवडता छंद देखील असू शकतो. पण, ही Photography करण्यासाठी Camera महत्वाची भूमिका बजावतो हे तर तुम्हांला माहित असेलच. Camera हे एक असं डिव्हाइस आहे कि त्याच्याद्वारे आपण आपल्या सभोवताली असणाऱ्या कोणत्याही दृश्याचे चित्रिकरण करू शकतो.

 

तसेच, आपण आपल्या जीवनातील आठवणीही कैद करू शकतो. उदा., कुठे फिरायला गेले असतानाची दृश्ये, कार्यक्रमातील दृश्ये इत्यादी. जेव्हा या कॅमेराचा शोध लागला तेव्हा सामान्यजनांना ते परवडणारं नव्हते, कारण त्याची किमंत खूप जास्त होती त्यामुळे फक्त श्रीमंत लोकच याचा लाभ घेऊ शकत होते.

 

परंतु, कालांतराने त्यामध्ये खूप काही बदल झाले आणि Digital Camera चा शोध लागला. त्यामुळेच आज आपण वापरत असलेल्या स्मार्ट फोन मध्येही कॅमेराने स्थान मिळवले आहे. तर या लेखात आपण याच डिजिटल कॅमेराविषयी माहिती घेणार आहोत.

 

Digital Camera
Digital Camera

 

डिजिटल कॅमेरा म्हणजे काय? | What is digital camera?

असा कॅमेरा कि ज्याच्याद्वारे आपण डिजिटल स्वरूपात इमेजेस घेऊन त्या संगणकात संग्रहित करून स्क्रीनवर डिस्प्ले करू शकतो. तुम्ही पाहिले असेल Analog Camera मध्ये रोल चा वापर करण्यात येत होता.

 

 

डिजिटल कॅमेराचा शोध कोणी व कधी लावला? | Who invented digital camera?

डिजिटल कॅमेऱ्याचा शोध कोडक अभियंता स्टीव्ह सॅसन (Steve Sasson) यांनी 1975 मध्ये लावला. 1990 च्या दशकात डिजिटल कॅमेरा लोकांना वापरावयास मिळाला. 20 व्या दशकापर्यंत डिजिटल कॅमेराने फिल्मी जगतात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आणि 2010 पासून डिजिटल कॅमेरे आपल्या स्मार्ट फोनमध्ये येण्यास सुरुवात झाली.

 

 

डिजिटल कॅमेरा कार्य कसा करतो?

मूळात सगळ्या कॅमेऱ्यांची रचना ही सारखीच असते. त्यामध्ये लेन्स, बॅटरी कंपार्टमेंट, फ्लॅश कॅपॅसिटी, फ्लॅश लॅम्प, शटर, इमेज सेन्सर असे विविध घटक समाविष्ट असतात. जेव्हा शटर बंद असते, तेव्हा लेन्समधून कोणताही प्रकाश कॅमेऱ्यात प्रवेश करू शकत नाही.

See also  SQL म्हणजे काय? | एसक्यूएल म्हणजे काय

 

परंतु जेव्हा आपण शटर उघडन्यास शटर बटण दाबतो तेव्हा प्रकाश लेन्सच्या मदतीने कॅमेरात असलेल्या प्रकाश संवेदनशील सामग्रिवर प्रहार करतो आणि आतमध्ये प्रवेश करतो. याच प्रकाशाचे रूपांतरण कॅमेरा चित्रात करतो आणी छायचित्र तयार होतो.

 

डिजिटल कॅमेरा छायचित्र तयार करण्यासाठी विविध घटकांचा वापर करतो ते घटक सामान्य कॅमेरात उपलब्ध नसतात. तर त्यातील काही घटकांची माहिती पुढीलप्रमाणे:

 

इमेज सेन्सर | Image Sensor

ईमेज सेन्सर इलेक्ट्रॉनिक दृश्ये रेकॉर्ड करण्यासाठी वापरले जाते. डिजिटल कॅमेरात इमेज सेन्सर चा उपयोग रंग वेगळे करण्यासाठी आणी दृश्ये रेकॉर्ड करण्यासाठी सिग्नल प्रोसेसिंग सर्किटमध्ये केला जातो. सेन्सर बनविण्याकरिता CDD (Charge coupled Device) आणि CMOS (Complementary Metal-Oxide Semiconductor) चा वापर केला जातो. आजकाल इमेज सेन्सरचा वापर डिजिटल कॅमेराबरोबर रोबोटिक्स मध्येहि होताना दिसतो.

 

डिजिटल कनव्हर्टर | Digital Convertor

इमेज सेन्सर द्वारे संग्रहित केलेला डेटा हा पिक्सेल मध्ये असतो त्याचे 0 आणि 1 म्हणजेच डिजिटलमध्ये रूपांतर करणे आवश्यक असते, ते डिजिटल कनव्हर्टर चिप करत असते.

 

सर्किट बोर्ड | Circuit Board

डिजिटल कॅमेऱ्यामध्ये एक सर्किट बोर्ड असतो ज्यामध्ये डेटा रेकॉर्ड करण्यासाठी कॅमेरा वापरात असलेली संगणक चिप असते. इमेज सेन्सर आणि चिप्समधील डेटा संग्रहित करण्यासाठी सर्किटरी मेमरी कार्ड कनेक्ट केलेला असतो. फिल्मी कॅमेऱ्यात सर्किट बोर्ड किंवा डिजिटल कनव्हर्टर आवश्यकता नसते.

 

डिस्प्ले स्क्रीन | Display Screen

कॅमेराच्या सेटिंग्जमध्ये बदल करण्यासाठी तसेच फोटो तयार करण्यासाठी आणि छायचित्रे शूट केल्यानंतर ते पुन्हा पाहण्यासाठी डिस्प्ले स्क्रीनचा वापर केला जातो. फिल्मी कॅमेऱ्यात कोणतेही प्रदर्शन स्क्रीन नसते, ते दृश्ये बदलण्यासाठी व्ह्यूफाइंडर, सेटिंग्ज बदलण्यासाठी बटने आणि डायलवर अवलंबून असतात.

 

 

डिजिटल कॅमेराचे उपयोग | Benefits

  • डिजिटल कॅमेराद्वारे चित्रित केलेली छायाचित्रे काही क्षणातच स्क्रीनवर प्रदर्शित केली जाऊ शकतात.
  • चित्रित केलेली छायाचित्रे एका मेमरी कार्डमध्ये संग्रहित केली जाऊ शकतात.
  • यामध्ये आवाजाबरोबर विडिओ पण रेकॉर्ड केला जाऊ शकतो.
  • चित्रित केलेली छायाचित्रे एडिट किंवा डिलिटही करू शकतो.
  • काही मॉडर्न डिजिटल कॅमेरे संगणकालाही कनेक्ट करू शकतो.
See also  डोमेन नेम म्हणजे काय? | Domain Name

 

हे पण वाचा…..

 

 

1 thought on “डिजिटल कॅमेरा माहिती मराठीमध्ये”

Leave a Comment