रुपयाची घसरण का होते ? | Rupee Depreciation

आपण बऱ्याचदा न्यूज चॅनेल्स अथवा पेपर मध्ये रुपयाची घसरण झाल्याच्या बातम्या पाहिल्या असतीलच. रुपयाची घसरण म्हणजे, आपल्यासाठी एक चिंतेची बाब आहे. तर रुपयाची घसरण का होत आहे ?  याचं उत्तर आपण या लेखात घेण्याचा प्रयत्न करू या.

Rupee Depreciation
Rupee Depreciation

 

रुपयाची घसरण का होत आहे ?

हल्ली आपलं चलन (currency) खूप चर्चेमध्ये आहे. कारण दिवसेंदिवस रुपयाची होणारी घसरण यासाठी कारणीभूत ठरत आहे. आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा आपलं चलन अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सारखेच होते. पण, मागच्या 70 वर्षात असं काय झालं कि, आपल्याला आता एका डॉलरमागे 74 रुपये मोजवे लागत आहेत. त्याची अनेक कारणे असू शकतात. काही कारणे पुढीलप्रमाणे :

1) वाढती लोकसंख्या

आपल्या भारत देशाचा आवाका पाहिल्यास, एकूण घरगुती उत्पादन (gross domestic product) त्या तुलनेत फारच कमी पडेल. म्हणून आपल्याला आपल्या गरजा भागवण्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे अगदी प्राथमिक गरजांपासुन ते थेट चैनीच्या वस्तूंपर्यंत अनेक वस्तू आपण इतर देशांकडून आयात करतो.

 

2) अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कमी प्रमाणात वापर

इतर देशातील उद्योगधंदे हे आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत आणि त्याद्वारे कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाते. परंतु, आपल्याकडे अजून अशा तंत्रज्ञानाचा फारसा स्वीकार झालेला दिसत नाही. त्यामुळेच आपण आपल्या गरजा भागवून इतर देशांना वस्तूंची निर्यात करण्यामध्ये कमी पडत आहोत.

 

3) वस्तूंची वाढती आयात

जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाचे चलन हे फार मजबूत स्थितीत होते. कारण त्यावेळी देशात होणारे उत्पादन हे देशाच्या लोकसंख्येला पुरेसे होते, सहाजिकच आयात कमी प्रमाणात व्हायची. तेव्हा आपल्या देशाची लोकसंख्या ही 30 करोड (30 crore) होती मात्र आज 130 करोड (2011 च्या जनगणनेनुसार) पेक्षाही जास्त आहे. म्हणून एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी आपल्या इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. साहजिकच वस्तूंची आयात वाढते.

See also  कुस्ती म्हणजे काय? इतिहास, मैदान आणि नियम

 

एखाद्या देशाच्या चलनाचे मूल्य कशावरून ठरते ?

एखाद्या देशाच्या चलनाचे मूल्य हे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते. आज जगात सगळ्यात बळकट अर्थव्यवस्था ही अमेरिका या देशाची आहे. कारण या देशाचे एकूण घरेलू उत्पादन हे इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे अमेरिका आपल्या देशातील माल इतर देशांना निर्यात करतो. आणि व्यापारासंबंधित सगळे व्यवहार हे अमेरिकन डॉलर मध्ये होतात म्हणून या देशाच्या चलनाचे मूल्य वधारत आहे. फक्त अमेरिका देशाचे व्यवहार हे डॉलरमध्ये होतात असे नाही. तर जगभरातील अशा बऱ्याचशा देशांचे व्यवहार हे अमेरिकन डॉलरमध्ये होतात.

यावरून आपल्याला हे समजते कि, जगभरात एखाद्या चालनाद्यारे जास्त व्यवहार होत असतील तर त्या चलनाचे मूल्य वाढते. जगभरात कोणत्या चालनाद्यारे जास्त व्यवहार होतात त्यासाठी खाली दिलेला तक्ता पहा.

चलन व्यापाराचे प्रमाण % मध्ये
अमेरिकन डॉलर(USD) 44.15
युरो(EUR) 16.14
जपानी येन(JPY) 8.40
पाउंड स्टर्लिंग(GBP) 6.40
ऑस्ट्रेलियन डॉलर(AUD) 3.38
कॅनेडियन डॉलर(CAD) 2.52
स्विस फ्रँक(CHF) 2.48
चीनी रेन्मिन्बी(CNY) 2.16
हाँगकाँग डॉलर(HKD) 1.77
न्यूझीलंड डॉलर(NZD) 1.04
इतर 11.56

आपल्याला असं करावं लागेल जेणेकरून आपल्या रुपयाचे मूल्य वधारेल. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. धन्यवाद!

 

हे पण वाचा…..

Leave a Comment