आपल्या गुणवत्तापुर्ण उत्पादनांसाठी प्रसिध्द असणारी गोकुळ डेरी भारत देशासह जगभरात ओळखली जाते. सध्या चालू असलेल्या निवडणूक प्रक्रियेमुळे ती सध्या चर्चेचा विषय बनलेय. सगळ्याचं कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून राहीलं आहे. पण, या लेखात आपण त्याविषयी चर्चा करणार नाही आहोत. तर आपण गोकुळ डेरीविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत.
गोकुळ डेरीची स्थापना कधी झाली?
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांच्यामार्फत चालविण्यात येणाऱ्या गोकुळ डेरीची स्थापना 16 मार्च 1963 मध्ये झाली. ‘ऑपेरेशन फ्लड’ योजने अंतर्गत गोकुळची स्थापना कोल्हापूर येथे करण्यात आली आहे. देशभरातील दूध उत्पादक संघामध्ये अमूल नंतरचा गोकुळ दुसरा मोठा दूध उत्पादक संघ आहे. जरी अमूल मोठा दूध उत्पादक संघ असला तरी गुणवत्तेमध्ये गोकुळच अग्रेसर आहे.
गोकुळचं दूध आपल्यापर्यंत कसं पोहोचते?
कोणताही दूध उत्पादक संघ हा स्वतः गायी-म्हशी पाळत नाही. तर तो छोट्या किंवा घरगुती दूध उत्पादकांकडून दुधाचे संकलन करतो. आणि दुधावर प्रकिया करुन कॅरीबॅगमध्ये पॅक केलं जाते व त्यानंतर होलसेल किंवा रिटेलर्सद्वारे आपल्यापर्यंत पोहोचते.
गोकुळचा पशु संगोपन कार्यक्रम
गोकुळ संघ हा उत्पादनाबरोबरच पशु संगोपनावरदेखील भर देत आहे. पशु संगोपनामध्ये त्यांचे आरोग्य, प्रजनन, खाद्य, अशा विविध घटकांचा समावेश होतो. दुधाची गुणवत्ता सुधारण्यासाठी पशुंना पौष्टिक आहार व नेहमीतपणे पशु वैद्यकीय तपासणी केली जाते. वैरणीची गुणवत्ता वाढवण्यासाठी सायलेज बॅगचा वापर केला जातो. वैरणीचा प्रश्न सोडविण्यासाठी संघाने ‘महालक्ष्मी’ नावाचा स्वतःचा पशुखाद्य सुरु केला प्रकल्प असून तेथे दररोज 200 मेट्रीक टन पशुखाद्य उत्पादन केले जाते. तसेच, पशुंचे आरोग्य सुधारण्यासाठी मुक्त गोठा संकल्पना राबविण्यात आली आहे.
मुक्त गोठा संकल्पनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :
- मुक्त गोठा म्हणजे गायी-म्हशींना रसिने एका ठिकाणी बांधून ठेवले जात नाही.
- मुक्त गोठ्याची जेवढी जागा असेल त्यामध्ये गायी कोठेही मुक्तपणे संचार करू शकतात.
- अशा गोठ्याची साफ-सफाई करणे देखील सोपे जाते.
- मुक्त संचारामुळे पशुंच्या शरिराचा व्यायाम होतो आणि त्यामुळे खाल्लेला चारा चांगल्याप्रकारे पचन होते.
- मुक्त गोठ्यात त्वचेवरिल रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
मिळालेले पुरस्कार
- 1989-90 व 1991-92 या दोन वर्षी भारत सरकारने “राष्ट्रीय उत्पादकता परिषद पुरस्कार” प्रदान केला.
- महाराष्ट्र सरकारने 3 वेळा “सहकार भूषण” पुरस्कार देऊन गौरविले आहे.
हे पण वाचा…..
Sir dairy farm open karnar aahe in chikli shirala i need some guidance soon mail me up sir
Tumhi [email protected] ya mail id var mail karu shakta