विमानाचा शोध कोणी लावला?

विमानाचं नाव घेतलं कि बऱ्याच जणांना हवाई सफर करण्याची इच्छा होते. काहींना विमान प्रवासाची भीती देखील वाटते. हे सगळं ज्यांनी आजपर्यंत विमान प्रवास केला नाही त्यांच्या बाबतीत घडते. विमान हे दळणवळणाचं असं साधन आहे कि ते खूप कमी वेळेत आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवत असते. बाकी आपण बस, आगगाडी किंवा इतर खाजगी दळणवळणाच्या साधनांचा विचार केल्यास विमान प्रवास खूप जलद गतीने होतो. तर अशा या विमानाचा शोध कोणी व कधी लावला त्याविषयी जाणून घेऊ या.

 

Aeroplane
Aeroplane

 

विमानाचा शोध कोणी व कधी लावला?

विमानाचा शोध कोणी लावला याविषयी थोडा संभ्रम आहे. असं म्हटले जाते कि, शिवकर बापूजी तळपदे (Shivkar Bapuji Talpade) या महाराष्ट्रातील व्यक्तीने सन 1895 मध्ये विमानाचा शोध लावला. पण, तळपदे यांच्याऐवजी राईट बंधूनी (Wright Brothers) विमानाचा शोध लावल्याचे म्हटले जाते.

तर असं का?

तळपदे यांनी खूप मेहनत करून एका विमानाची निर्मिती केली होती. त्याला नाव दिले होते “मरुत्सका“, मरु म्हणजे हवा आणि त्सका म्हणजे मित्र होय.

 

विमान बांधणी पूर्ण झाल्यानंतर तळपदे यांनी सन 1895 मध्ये त्याची यशस्वी चाचणी मुंबईकरांसमवेत गोविंद रानडे आणि सयाजीराव गायकवाड यांच्या उपस्थितीत मुंबई चौपाटीवर करण्यात आली होती. विमानाने 20 मीटर उंचीपर्यंत उड्डाण केलं आणि खाली आले. त्यानंतर तळपदे त्यावर खूप प्रयोग केले आणि ते यशस्वीही झाले. परंतु, काही वर्षांनी त्यांची प्रकृती खालावली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांनी बनवलेलं विमान त्यांच्या मुलांसाठी खेळणं बनून राहीले.

 

नंतर तब्बल 8 वर्षांनी म्हणजेच सन 17 डिसेंबर 1903 मध्ये राईट बंधूनी बनवलेल्या विमानाने यशस्वी उड्डाण केले. आणि त्याच धर्तीवर नंतर कितीतरी विमानांची निर्मिती झाली. म्हणून आज आपणांला कोणीही, “विमानाचा शोध कोणी लावला?” असं विचारल्यास, आपण राईट बंधूंच नाव घेतो.

 

खरं तर शिवकर बापूजी तळपदे यांनी सर्वप्रथम विमानाचा शोध लावला. पण, याचं श्रेय हे दुसऱ्या कोना व्यक्तींना जात आहे. काहींचे असं म्हणणे आहे कि, इतिहासात नोंद नसल्यामुळे तळपदे यांना विमान बनवण्याचं श्रेय दिलं जात नाही. यावरून अशी शंका व्यक्त केली जात आहे कि, असे काही शोध मागील शतकांमध्ये भारतीयांकडून लागले असावेत. पण, त्याची इतिहासात नोंद झाली नसावी. तुम्हांला याविषयी काय वाटते ते जरुर कंमेंट बॉक्समध्ये नोंदवा.

See also  भारताच्या विकासासाठी भारतीय भाषा का आवश्यक आहेत?

 

 

विमान प्रवासाबद्दल थोडक्यात

भारतामधील विमानाचे तिकीट दर

प्रवासाचा काळावधी किमान भाडे कमाल भाडे
40 मिनीटांपर्यंत Rs 2,000 Rs 6,000
40 – 60 मिनिटे Rs 2,500 Rs 7,500
60 – 90 मिनिटे Rs 3,000 Rs 9,000
90 – 120 मिनिटे Rs 3,500 Rs 10,000
120 – 150 मिनिटे Rs 4,500 Rs 13,000
150 – 180 मिनिटे Rs 5,500 Rs 15,700
180 – 210 मिनिटे Rs 6,500 Rs 18,600

 

पहिल्यांदा विमानाने प्रवास करणार आहात?

आजकाल विमानाने प्रवास करणे खूप सोपे झाले आहे. हवाई प्रवास काही तासांमध्ये प्रवास पूर्ण होऊन वेळेची देखील बचत होते. पहिल्यांदा विमानाने प्रवास करणारे प्रवासी उत्साही आणि थोडे चिंताग्रस्त असतात. कारण त्यांना बोर्डिंग आणि चेक-इन प्रक्रियेबद्दल माहिती नसते.

जर तुम्हीही पहिल्यांदा विमानाने प्रवास करत असाल, तर विमान प्रवासाचे तिकीट काढण्यापासून बोर्डिंग करेपर्यंत कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे तुम्हांला माहित असणे गरजेचे आहे. यासाठी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

1) तिकीट बुक करताना काळजी घ्या

फ्लाइट तिकीट बुक करताना नेहमी तुमच्या मूळ आयडीप्रमाणेच नाव आणि वय लिहा आणि नावाचे स्पेलिंग देखील लक्षात ठेवा.

 

2)दोन वर्षांची मुले मोफत प्रवास करू शकतात

14 दिवस ते 2 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी विमान प्रवास करण्यासाठी तिकीटाची आवश्यकता भासत नाही. अर्थात त्यांना फ्री विमान प्रवास करता येतो.

 

3)दोन तासांपूर्वी विमानतळावर पोहोचावे

ज्या कोणत्याची दिवशी तुम्ही विमान प्रवास करत आहात. त्या दिवशी विमान take off करण्याअगोदर किमान 2 तास आधी विमानतळावर पोहोचावे. कारण airport formalities वेळ लागतो.

 

4)सिक्युरिटी गार्ड

विमानतळावर प्रवेश करण्यासाठी, तुम्हांला तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाला तुमच्या तिकिटाची फोटोकॉपी आणि तुमचे ओळखपत्र (ID proof) दाखवावे लागेल. त्यानंतरच तुम्हांला आतमध्ये सोडण्यात येते.

See also  वेब होस्टिंग म्हणजे काय? | Web Hosting

 

5)ओरिजनल आयडी घेऊन जा

विमानाने प्रवास करताना तुमचा मूळ आयडी (पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड) सोबत ठेवा. जर तुमच्यासोबत लहान मूल असेल तर त्याचे जन्म प्रमाणपत्र सोबत ठेवावे.

 

6)केबिन बॅग

जर तुमच्याकडे भरपूर सामान असेल तर तुम्ही विमानतळावरून ट्रॉली घेऊ शकता. ही एक विनामूल्य सेवा आहे. तथापि, विमान कंपनीच्या नियमांनुसार, एका प्रवाशाला एक केबिन बॅग आणि दोन मोठ्या बॅग्स घेऊन येण्याची परवानगी आहे.

 

7)शस्त्रे (weapons) सोबत बाळगू नये

उड्डाण दरम्यान कोणत्याही शस्त्रे सोबत बाळगू नका कारण या सर्व गोष्टी फ्लाइटमध्ये प्रतिबंधित आहेत.

 

8)विमान तिकीट काउंटर

प्रत्येक एअरलाईन्सचे वेगवेगळे काउंटर विमानतळ बारमध्ये बनवले जातात. तुम्ही तुमच्या फ्लाईटचे तिकीट तुमच्या एअरलाईन्स काउंटरवर तपासावे. येथे तुम्हांला सांगू इच्छितो की, देशांतर्गत उड्डाणांचे काउंटर 45 मिनिटे आधी तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे काऊंटर दोन तास आधी बंद होते.

 

9)बोर्डिंग पास

एअरलाईन काउंटरवर तुमचे सर्व आयडी आणि तिकिटे तपासल्यानंतर तुम्हाला काउंटरवरून बोर्डिंग पास दिला जातो ज्याद्वारे तुम्हांला फ्लाइटमध्ये चढण्याची परवानगी दिली जाते. बोर्डिंग पास घेताना तुम्ही तिकीट काउंटरवर खिडकीच्या सीटची मागणी करू शकता.

 

10)चेक-इन काउंटर

आता तुम्हाला चेकिंग काउंटरवर तुमचा बोर्डिंग पास आणि आयडी दाखवावा लागेल आणि तिथे तुमचे सामान द्यावे लागेल जे कार्गो विभागात जाते. व फ्लाइटच्या लँडिंगच्या वेळी तुमचे सामान तुम्हांला परत केले जाते.

 

11)बॅग स्टिकर

तुमची बॅग पूर्णपणे तपासल्यानंतर त्यावर एक स्टिकर लावला जातो. जो तुम्ही विमानतळातून बाहेर पडल्याशिवाय काढू नये.

 

12)सिक्योरिटी तपासणी

आता पुढे तुमचा बोर्डिंग पास सुरक्षा दलाकडून तपासला जाईल आणि त्यांना तुमचा सीट नंबर आणि फ्लाइटची माहिती एंट्री गेटवर स्टॅम्प करून पुरवली जाईल.

 

13)सीट क्रमांक

तुमच्या बोर्डिंग पासवर तुमच्या सीट नंबरचा उल्लेख केला जातो. तरीही तुम्हांला तुमची सीट सापडत नसेल, तर एअर होस्टेस तुम्हाला तुमच्या सीटबद्दल माहिती देतील. तुमची हँड बॅग तुम्ही बसलेल्या सीटच्या वर ठेवावी.

See also  भारतीय रेल्वेचा इतिहास | History of Indian Railways

 

14)सीट बेल्ट लावायला विसरू नका

फ्लाइटचे क्रू मेंबर्स तुम्हांला फ्लाइट take off च्या आधी काही महत्वाची माहिती देतील, जी तुम्ही काळजीपूर्वक ऐकली पाहिजे. आणि टेक ऑफ आणि लँडिंग दरम्यान तुमचा सीट बेल्ट घालायला विसरू नका.

 

15)विमानात जेवण

फ्लाइटमध्ये क्लास नुसार तुम्हांला काही मोफत जेवण दिले जाते. आणि तुम्हांला हवे असल्यास तुम्ही फ्लाइटमध्ये जेवण मागवू करू शकता. पण, लक्षात ठेवा फ्लाइटमध्ये गोष्टी थोड्या महाग असतात.

 

16)फ्लाइट डेस्टिनेशन

फ्लाइट डेस्टिनेशनवर पोहोचल्यानंतर, तुम्ही तुमचा सीट बेल्ट काढा आणि टर्मिनलकडे जा जेथे तुम्ही बॅगेज काउंटरवरून तुमची बॅग घेऊ शकता.

17)बैगेज काउंटर

बॅगेज काउंटरवरून बॅग घेताना थोडी काळजी घ्या आणि स्टिकर पाहिल्यानंतरच तुम्ही तुमची घेऊन विमानतळाच्या बाहेर निघावे.

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ

Question : विमान किती उंचीवर उडते?

Answer : विमान आकाशात 33,000 ते 42,000 फूट उंच उडते.

Question : भारतीय विमान सेवेचे बोधचिन्ह कोणते?

Answer : एअर इंडिया (Air India)

Question : भारतात एकूण किती विमानतळे आहेत?

Answer : भारतात सध्या 136 विमानतळे कार्यरत आहेत.

Question : महाराष्ट्रात एकूण किती विमानतळे आहेत?

Answer : महाराष्ट्रात एकूण 13 विमानतळे आहेत.

Question : भारतातील पहिले विमानतळ कोणते?

Answer : जुहू (Juhu) हे भारतातील पहिले विमानतळ असून त्याची स्थापना १९३२ झाली होती.

 

हे पण वाचा…..

Leave a Comment