कोणतेही क्षेत्र का असेना, आज भारत देश जगभरात आपल्या विविध पराक्रमांमुळे आपली वेगळीच ओळख निर्माण करत आहे. शिक्षण, विज्ञान, शेती, वैद्यकिय व इतर काही अन्य क्षेत्रही आहेत त्यामध्ये भारत अग्रेसर आहे. या क्षेत्राबरोबरच भारत आज अंतराळात उपग्रह पाठविण्यापासून मंगळयान सारख्या मोहिमा हाती घेऊन खूप वेगाने प्रगती करत आहे. भारताच्या या मोहिमांमुळे इतर देश तोंडात बोटे घालत आहेत. हे सगळं इस्रोमुळे (isro) शक्य झालं आहे. तर या लेखात आपण याच इस्रो विषयी मराठी मध्ये माहिती घेणार आहोत.
इस्रो म्हणजे काय? | What is ISRO?
इस्रो म्हणजेच भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space research Organization) होय. ही भारत सरकारची अंतराळ संस्था असून या संस्थेमार्फत विविध उपग्रहांचे प्रक्षेपण करून देशातील नागरिकांना विविध प्रकारे मदत करत आहे. या संस्थेवर पूर्णपणे केंद्र सरकारचे नियंत्रण असते व इस्रो केंद्र सरकारलाच अहवाल सादर करत असते. जगातील 6 सरकारी अंतराळ संस्थांपैकी इस्रो एक आहे, जिच्याकडे स्वतःची अशी पूर्ण प्रक्षेपण व्यवस्था आहे.
इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? | ISRO Headquarter
बैंगलोर, कर्नाटक (Bangalore, Karnataka)
इस्रोची स्थापना कधी झाली?
15 ऑगस्ट 1969 इस्रोने INCOSPAR ची (Indian National Committee for Space Research) जागा घेतली. INCOSPAR ची स्थापना सन 1962 मध्ये पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाईच्या पुढाकाराने करण्यात आली.
इस्रोच्या यशोगाथा
आर्यभट्ट उपग्रह (Aryabhata Satellite)
भारताने आपला पहिला उपग्रह 19 एप्रिल 1975 रोजी पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित केला. याला प्रसिद्ध भारतीय खगोलशास्त्रज्ञ ‘आर्यभट्ट’ यांचं नाव देण्यात आलं. हा उपग्रह प्रक्षेपणासाठी सोवियत संघाने (European Union) भरताला मदत केली.
रोहिणी उपग्रह (Rohini Satellite)
1980 साली भारताने ‘रोहिणी’ हा स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला. यासाठी SLV – 3 या प्रक्षेपणाचा वापर केला गेला होता.
INSAT प्रक्षेपण
INSAT म्हणजे ‘Indian National Satellite System’ होय. हा आशिया – पॅसिफिक प्रदेशातील स्वदेशी संचार उपग्रह आहे. यामध्ये 9 दळणवळण उपग्रह समाविष्ट आहेत ज्यांना भौगोलिक कक्षेमध्ये (geostationary orbit) स्थापित केले आहे. या उपग्रह उपग्रहांना सन 1983 मध्ये प्रसारण, दूरसंचार, हवामान अंदाज, शोध आणि बचाव अभियान, अवकाश विज्ञान आणि आपत्ती इशारा अशा विविध कारणांसाठी पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित केले आहे. INSAT च्या प्रक्षेपणानंतर देशाच्या संचार क्षेत्रात मोठी क्रांती सुरु झाली.
चंद्रयान – 1
चंद्रयान – 1 हा इस्रोचा असा मिशन होता कि त्याने भारताच्या अंतराळ प्रक्षेपण कार्यप्रणालीला पूर्णपणे बदलून टाकले. हा चंद्रासंबंधित भारताचा पहिला प्रक्षेपण होता. याचं प्रक्षेपण ऑक्टोबर 2008 मध्ये करण्यात आले. भूशास्त्र विज्ञान, चंद्रावरील खनिजे यांविषयी माहिती मिळविण्यासाठी चंद्रयान मिशन हाती घेण्यात आले.
एकसोबत 104 उपग्रहांचे प्रक्षेपण
भारताने 104 उपग्रह उपग्रहांचे प्रक्षेपण करून एक विश्वविक्रम केला. कारण आजपर्यंत कोणत्याही देशाने एकाच वेळी एवढे उपग्रह प्रक्षेपित केले नाहीत. यागोदर रशियाने 37 उपग्रहांचे प्रक्षेपण एकाच वेळी केले आहे. सन 2017 मध्ये भारताने भारतीय रॉकेट PSLV च्या मदतीने या 104 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले होते. यामध्ये 101 परदेशीय उपग्रह होते तर 3 भारताचे होते. इस्रोची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी होती.
IRNSS प्रक्षेपण
IRNSS म्हणजे ‘Indian Regional Navigation Satellites System’ होय. हा एक प्रादेशिक उपग्रह असून देशातील नागरिकांना परिपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देश्याने याची निर्मिती करण्यात आली. IRNSS च्या प्रक्षेपणानंतर भारत 5 वा देश बनला ज्याच्याकडे स्वतःचा navigation system उपग्रह आहे.
भारतीय प्रक्षेपक
प्रक्षेपक म्हणजे, ‘अंतराळ यान अवकाशात घेऊन जाण्यासाठी वापरले जाणारे साधन होय’. त्यांना आपण वैज्ञानिक भाषेत लाँच वेहिकल म्हणतो. भारताकडे अशी एकूण दोन साधने आहेत.
1)PSLV
2)GSLV
1)PSLV
ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (polar satellite launch vehicle) ज्याला आपण संक्षिप्त रुपात PSLV म्हणतो. हा इस्रोचा शाश्वत प्रक्षेपक असून जागतिक अंतराळ स्पर्धेत आघाडी मिळवून देण्यात याच प्रक्षेपणाचा मोलाचा वाटा आहे. PSLV द्वारे केल्या गेलेल्या प्रथम 36 यशस्वी प्रक्षेपणानंतर PSLV लाँच वेहिकल अंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी उपग्रह प्रक्षेपणासाठी खुले करण्यात आले.
PSLV ची वैशिष्ट्ये
उंची (Height) | 44 मीटर |
व्यास (Diameter) | 2.8 मीटर |
वजन वाहून नेण्याची क्षमता | 320 टन |
प्रकार | 3 (PSLV-G, PSLV-CA, PSLV-XL) टन |
प्रथम उड्डाण | 20 सप्टेंबर 1993 |
2)GSLV
भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक (Geosynchronous satellite launch vehicle) ज्याला आपण संक्षिप्त रुपात GSLV म्हणतो. हे वेहिकल प्रमुख्याने पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेमध्ये असणाऱ्या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यासाठी विकसित केले गेले आहे.
तुम्हांला हा लेख कसा वाटला ते कंमेंट बॉक्समध्ये कंमेंट करून जरुर सांगा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ
Question : isro stands for ?
Answer : Indian Space research Organization
Question : When was isro founded ?
Answer : 15 ऑगस्ट 1969
This very important for study . it’s help to search on space . thanks for giving these website on Google .thank you google❣️
Keep visiting marathig.com