सायबर सुरक्षा म्हणजे काय? | What Is Cyber Security?

20 व्या शतकातील सर्वात महत्वाच्या शोधांपैकी एक म्हणजे इंटरनेट (Internet) होय. परंतु, याचं खरं महत्व 21 व्या शतकाच्या सुरुवातीपासून दिसण्यास सुरु झाले. आज कितीतरी लोक इंटरनेटद्वारे काम करून आपली उपजिविका करत आहेत. आज अनेक उद्योगधंद्यांमध्ये इंटरनेटचा वापर होत आहे. आपल्याला एखादी माहिती मिळवायची असल्यास आपण इंटरनेटचा वापर करतो.

 

यामध्ये बऱ्याचदा ऑनलाईन fraud, डेटा चोरी, दुष्ट हल्ले अशा घटना वारंवार झाल्याच्या बातम्या आपल्या कानावर पडत असतात. यांपासून संरक्षण मिळविण्यासाठी तुम्ही सायबर सुरक्षा हा शब्द कधी ना कधी ऐकला असेलच. सायबर सुरक्षा जी या सगळ्यांपासुन आपल्या डेटा वा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे संरक्षण करते. तर याच सायबर सुरक्षेविषयी आपण या लेखात माहिती घेणार आहोत.

Cyber Security
Cyber Security

सायबर सुरक्षा म्हणजे काय? | What is Cyber Security?

संगणक, सर्व्हर, मोबाइल डिव्हाइस, इलेक्ट्रॉनिक गॅझेट, नेटवर्क आणि डेटाबेसवरील दुष्ट हल्ले यासारख्या इंटरनेट संबधी सिस्टमचे संरक्षण तंत्र म्हणजे सायबर सुरक्षा (cyber security) होय. आपण सायबरसुरक्षा दोन भागात विभागू शकतो एक म्हणजे सायबर, आणि दुसरा सुरक्षा. सायबर तंत्रज्ञानाचा संदर्भ देतो ज्यात सिस्टम, नेटवर्क, प्रोग्राम्स आणि डेटा समाविष्ट असतो. आणि दुसरा भाग म्हणजे सुरक्षा जो या सगळ्यांचे illegal activities पासून संरक्षण करतो. काही cases मध्ये याला इलेक्ट्रॉनिक माहिती सुरक्षा किंवा माहिती तंत्रज्ञान सुरक्षा देखील म्हटले जाते.

 

सायबर सुरक्षेची परिभाषा :

“नेटवर्क, उपकरणे, प्रोग्राम्स, डेटा, दुष्ट हल्ले आणि अनधिकृत प्रवेशापासून डेटा संरक्षण करण्यास वापरकर्त्यास मदत करते .”

 

सायबर सुरक्षेचे प्रकार | Types of Cyber Security

नेटवर्क सुरक्षा | Network Security :

यात अनधिकृत प्रवेश, घुसखोर, डेटाबेसवरील हल्ले आणि गैरवापरापासून संगणक नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची अंमलबजावणी केली जाते. ही सुरक्षा एखाद्या संस्थेस बाह्य आणि अंतर्गत धोक्यांपासून मालमत्तेचे संरक्षण करण्यास मदत करते.

 

Applications Security :

यात अनैतिक धोक्यांपासून सॉफ्टवेअर आणि डिव्हाइसचे संरक्षण केले जाते. अ‍ॅप्स हल्ल्यांपासुन सुरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी अ‍ॅप्सना सतत update करून संरक्षण दिले जाते.

See also  विमानाचा शोध कोणी लावला?

 

माहिती किंवा डेटा सुरक्षा | Information & Data Security :

यात डेटाची अखंडता (integrity) आणि गोपनीयता (privacy) राखण्यासाठी एक मजबूत डेटा स्टोरेज यंत्रणा समाविष्ट असते.

 

ओळख व्यवस्थापन | Identity Management :

ओळख व्यवस्थापन, ज्यास ओळख आणि प्रवेश व्यवस्थापन म्हणून देखील ओळखले जाते. तंत्रज्ञानाच्या संसाधनांमध्ये योग्य वापरकर्त्यांचा (user) योग्य प्रवेश असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी ओळख व्यवस्थापनाचा वापर केला जातो.

 

ऑपरेशनल सिक्युरिटी | Operational Security :

यात डेटा हाताळणे आणि सुरक्षित करणे या प्रक्रियेवर भर देऊन अधिक प्रमाणात सुरक्षा प्रदान केली जाते.

 

क्लाऊड सिक्युरिटी | Cloud Security :

डिजिटल युगात किंवा संस्थेच्या (organization) क्लाउड आर्किटेक्चरमध्ये संग्रहित माहितीचे संरक्षण करणे गरजेचे असते. धोक्यांपासून संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी विविध cloud सेवा प्रदाते (Providers) जसे की एडब्ल्यूएस (AWS), अझर (Azure), Google इत्यादींचा वापर करतात.

 

End-User Education :

चांगल्या सुरक्षा पद्धतींचा अवलंब न केल्याने सेलफोन, संगणक, टॅब्लेट आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये व्हायरसचा धोका निर्माण होऊ शकतो. सुरक्षिततेसाठी, वापरकर्त्यांनी संशयास्पद ईमेल attachments हटवने, spam mail delete करणे, कोणतेही अज्ञात यूएसबी ड्राइव्ह प्लग इन (unknown usb drive plug in) न करणे आणि अजून इतर महत्वाची काळजी घेणे गरजेचे आहे.

 

सायबर सुरक्षेची गरज का भासते? | Why we need Cyber Security?

आज आपण डिजिटल युगात जगत आहोत जिथे आपल्या जीवनाची कास ही नेटवर्क, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आणि सॉफ्टवेअर applications वर अवलंबून आहे. सर्व पायाभूत सुविधा जसे की बँकिंग सिस्टम, आरोग्य सेवा, वित्तीय संस्था, सरकारे आणि उत्पादन उद्योग यांमध्ये टेकनॉलॉजीचा वापर आवर्जून होत आहे. त्यांची माहिती, जसे की बौद्धिक संपत्ती, आर्थिक डेटा आणि वैयक्तिक डेटा आणि अनधिकृत प्रवेश या सगळ्यांवर इंटरनेटद्वारे दुष्ट हल्ले होऊन माहिती चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शक्यतो असे हल्ले आर्थिक लाभासाठी, खंडणीसाठी, राजकीय किंवा सामाजिक हेतूंसाठी किंवा फक्त तोडफोड करण्यासाठी केले जातात.

See also  टॉप 15 प्रोग्रामिंग भाषा | Programming Languages

सायबर-हल्ले आता आंतरराष्ट्रीय चिंता बनले आहेत जे सिस्टमला हॅक करून अर्थव्यवस्थेला धोका पोहोचवू शकतात. म्हणूनच, हाय-प्रोफाइल सुरक्षा उल्लंघनांपासून संवेदनशील माहितीचे संरक्षण करण्यासाठी उत्कृष्ट सायबरसुरक्षा धोरण असणे आवश्यक आहे. शिवाय, सायबर-हल्ल्यांचे प्रमाण वाढत असताना, कंपन्या आणि संघटना, विशेषत: राष्ट्रीय सुरक्षा, आरोग्य किंवा आर्थिक नोंदींशी संबंधित माहितीचा व्यवहार करणार्‍यांना त्यांचे व्यवसाय आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी सायबरसुरक्षेची गरज भासते.

 

सायबरसुरक्षेचे फायदे | Benefits of Cyber Security

  • व्हायरसपासून संरक्षण | Protection from Viruses : सायबर सुरक्षा सर्व प्रकारच्या virus attack, malware attacks, spayware इ. पासून संरक्षण प्रदान करते. ज्यामुळे तुमची प्रणाली किंवा नेटवर्कला गंभीर धोका उद्भवू शकतो.
  • डेटा चोरीपासून संरक्षण | Protection from Data theft : डेटा चोरी
    ही वापरकर्त्यांना भेडसवनारी एक मोठी समस्या आहे. सायबर सुरक्षा डेटा चोरीस प्रतिबंध करते. आपण आपला डेटा चोरीपासून संरक्षित करू शकता.
  • हॅकर्सपासून संरक्षण | Protection from Hackers : सायबर सुरक्षेद्वारे आपण आपल्या सिस्टम आणि नेटवर्कला हॅक होण्यापासून संरक्षीत करू शकतो. हॅकर्सपासून आपल्या सिस्टिमचे संरक्षण करण्यासाठी आपण पुढील उपायांचा वापर करू शकतो : कठीण password वापरा, आठवड्यातुन किमान एकदा तरी password बदला, वेळोवेळी browsing history clear करा, संरक्षण किट म्हणून आपल्या सिस्टिममध्ये anti virus इंस्टाल करा इ.
  • संगणक क्रॅश कमी करते | Reduces Computers Crashes : संगणक 3 ते 4 तास चालू ठेवल्यानंतर मध्ये काही वेळेसाठी बंद करा. नको असलेले फाइल्स फोल्डर डिलिट करा.
  • वापरकर्त्यांना गोपनीयता प्रदान करते | Gives Privacy to Users : सायबर सुरक्षा वापरकर्त्यांना अधिक गोपनीयता प्रदान करते. आपला डेटा आणि फायली कोठेही संचयित करण्याची अनुमती देते.

 

हे पण वाचा…..

Leave a Comment